Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Shreyas Iyer: कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या यशाचे श्रेय केवळ गौतम गंभीरला द्यायचे का? असा प्रश्न दिग्गज क्रिकेटपटूने उपस्थित केला आहे.
KKR | Gautam Gambhir
KKR | Gautam GambhirSakal
Updated on

Gautam Gambhir - Shreyas Iyer: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने चांगली कामगिरी केली आहे. कोलकाताने आत्तापर्यंत 11 सामन्यांतील 8 सामन्यांत विजय मिळवत पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे.

दरम्यान, कोलकातने रविवारी (5 मे) लखनौ सुपर जायंट्सला 98 धावांनी पराभूत करत आठवा विजय मिळवला होता. या विजयानंतर वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू इयान बिशप यांनी कोलकाताच्या यशाचे श्रेय संपूर्ण गौतम गंभीरला देणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी कोलकाताने माजी कर्णधार गौतम गंभीरला मेंटॉर म्हणून संघाशी जोडले. यानंतर त्याच्या आणि मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता संघ खेळताना दिसत आहे.

KKR | Gautam Gambhir
ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

दरम्यान, 2023 आयपीएलला श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे मुकला होता. त्यामुळे त्याचेही या हंगामातून पुनरागमन झाले. एकूण अनेक गोष्टी कोलकातासाठी या हंगामात चांगल्या जुळून आलेल्या दिसून येत आहेत.

मात्र, श्रेयसच्या नेतृत्वाबद्दल फारसे बोलले जात नसल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी लखनौविरुद्धच्या विजयानंतर ट्विट केले की 'थोडे प्रेम श्रेयस अय्यरलाही देणार का?'

यानंतर एका युजरने लिहिले की 'पण गौतम गंभीर परत आल्यानंतर त्याने त्याची जादू नारायणवर केली आणि युवा अंगक्रिशला पॉवरप्लेमध्ये बॅकअपला ठेवले. त्याने श्रेयस आणि वेंकटेश अय्यरला मधल्या फळीत फिरकीपटूंविरुद्ध खेळण्यासाठी ठेवले, जिथे ते जास्त सहज खेळू शकतात. त्याच्या या निर्णयांचा मोठा परिणाम दिसत आहे. श्रेयसनेही काही भूमिका निभावली आहे, पण मुख्य व्यक्ती गौतम गंभीरच आहे.'

KKR | Gautam Gambhir
Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

त्यावर बिशप यांनी ट्विट केले की 'म्हणजे जेव्हा कोलकाता जिंकणार तेव्हा त्याचे श्रेय गौतम गंभीरला मिळणार. पण जर ते पराभूत झाले, तर त्याचे खापर श्रेयसवर फोडणार की तू ते हरल्यानंतर म्हणणार की यात गंभीरची चूक होती?'

त्याआधीही याच युझरने लिहिले होते की 'याच संघाचे नेतृत्व 2022 मध्येही श्रेयस अय्यरने केले होते आणि आपल्याला निकाल माहित आहे. तो नक्कीच चांगला कर्णधार आहे, पण या संघासाठी गोष्टी बदलण्यात गौतम गंभीरचा प्रभाव अधिक आहे.'

यावर बिशप यांनी लिहिले होते की 'गौतम गंभीरने 2018 मध्ये 6 सामन्यांत 5 पराभव पाहिल्यानंतर श्रेयस दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार झाला होता. त्यानंतर दिल्लीने 8 सामन्यांत 4 विजय मिळवले.'

'त्याच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स तिसऱ्या क्रमांकावर होते, 2022 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. 2021 मध्ये तो दुखापतग्रस्त होता आणि फक्त 8 सामने पंतने नेतृत्व केले. 2022 मध्ये तो कोलकातामध्ये आला, ही नवीन फ्रँचायझी होती, तेव्हा ते 7 व्या क्रमांकावर राहिले, तर 2023 मध्येही त्याला संपूर्ण हंगाम मुकावा लागला आणि आता 2024.'

दरम्यान, शेवटी युजरने असेही सांगितले की 'जिंकले तर दोघांनाही श्रेय दिले जाईल आणि हरले तर दोघांनाही समानच जबाबदार धरले जाईल.'

बिशप यांनी केलेल्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.