Gautam Gambhir on RCB : रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात अतिशय रोमहर्षक पद्धतीने केकेआरने विजय मिळवला. आरसीबीनेही चुरशीची लढत दिली पण शेवटच्या चेंडूवर त्यांचा पराभव झाला. दरम्यान, केकेआरचे मार्गदर्शक गौतम गंभीरने आरसीबी संघासाठी केलेले एक ट्विट व्हायरल होत आहे.
आयपीएल 2024 मध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना झाला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 1 धावांनी थरारक पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 6 गडी गमावून 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ केवळ 221 धावा करू शकला आणि त्यांना अवघ्या एका धावेने सामना गमवावा लागला. या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.
आरसीबीसाठी या सामन्यात विल जॅकने 32 चेंडूत 55 धावा आणि रजत पाटीदारने 23 चेंडूत 53 धावा केल्या. मात्र संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. आरसीबीने शेवटपर्यंत हार मानली नाही. त्यांना शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज होती. पण ते फक्त एक धाव काढू शकले आणि सामना गमावला.
गौतम गंभीरने आरसीबीचे केले कौतुक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हरला असला तरी केकेआर मार्गदर्शक गौतम गंभीरने त्यांच्या मनोवृत्तीचे खूप कौतुक केले. त्याने ट्विट करून म्हटले की, आरसीबीने आज जबरदस्त कॅरेक्टर दाखवले.
मॅचच्या आधीही विराट कोहली आणि गौतम गंभीरचा सराव करतानाचा एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांशी बोलताना दिसले होते. गेल्या आयपीएल सीझनमध्ये विराट आणि गौतम गंभीरमध्ये वाद झाला होता, पण या सीझनमध्ये दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा मित्र बनले. आता दोन्ही खेळाडू एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटतात. आरसीबी स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे आणि केकेआर प्लेऑफमध्ये जाऊ शकतो. केकेआरची या हंगामात कामगिरी चांगली राहिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.