Gautam Gambhir: 'धोनी ज्याप्रकारे स्पिनर्सचा...', चेन्नई-कोलकाता लढतीबद्दल गौतम गंभीर काय म्हणाला?

Gautam Gambhir on CSK vs KKR: कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील लढतीबद्दल गौतम गंभीरने त्याचे मत मांडले आहे.
KKR vs CSK
KKR vs CSKSakal
Updated on

Gautam Gambhir News: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL) चर्चेत राहणाऱ्या संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचेही नाव येते. या दोन संघ कट्टर प्रतिस्पर्धांपैकी एक देखील समजले जातात. त्यांच्यातील अनेक सामनेही रोमांचक झाले आहेत.

सीएसके आत्तापर्यंत 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. यातील 2021 मध्ये सीएककेने केकेआरला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद जिंकले होते. तसेच केकेआरने दोनवेळा आयपीएल विजेतेपद मिळवले आहे, यातील 2012 मध्ये त्यांनी सीएसकेला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद जिंकले होते.

दरम्यान, या दोन संघांतील लढतीबद्दल केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीरने मत मांडले आहे. त्याने म्हटले आहे की दोन्ही संघ तुल्यबळ संघ असून दोन्ही संघ सारख्याच विचाराने पुढे जातात.

KKR vs CSK
Copa America 2024: मेस्सी करणार अर्जेंटिनाचे नेतृत्व, कोपा अमेरिका स्पर्धेसाठी संघाची घोषणा

42 वर्षीय गंभीर आर अश्विनला त्याच्या युट्युब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. तो म्हणाला, 'फक्त दोन संघातील सामन्याची विशालताच नाही, तर जेव्हा दोन चांगले संघ आमने-सामने असतात, तेव्हा नेहमीच रोमांच आणि थरार असतो. मला नेहमीच असं वाटतं की सीएसके आणि केकेआर हे दोन्ही संघ सामन्याला ज्याप्रकारे हाताळतात, त्यात खूप खूप सामन्य आहे.'

त्याने सांगितले की दोन्ही संघ सारखेच आहेत. तो म्हणाला, 'एमएस धोनी ज्याप्रकारे फिरकीपटूंचा विचार करायचा आणि केकेआरकडेही तीन चांगले फिरकीपटू होते. सीएसकेकडेही चांगले तीन फिरकीपटू होते. कदाचीत यामागे परिस्थिती कारण होते. चेपॉक किंवा ईडन गार्डन्सवरील खेळपट्टी त्यावेळी बऱ्यापैकी सारखी होती. ईडनपेक्षा चेपॉक मोठे होते.'

'आमच्या एकमेकांविरूद्धच्या रणनीतीमध्येही बरेच साम्य असायचे. त्यामुळे सीएसकेला पराभूत करण्यासाठी केकेआरला तांत्रिकदृष्टीनेही केकेआरला सर्वोत्तम द्यावे लागायचे. त्यामुळे मला वाटते की सीएसके आणि केकेआर हे दोन्ही त्याकाळी खूप साम्य असणारे संघ होते.'

KKR vs CSK
Arjun Tendulkar: सचिनचा मुलगा नरसोबा वाडीत काय करतोय ? अर्जुन पोहचला दत्ताच्या चरणी

दरम्यान गंभीर केकेआरचा अनेक वर्षे कर्णधार होता. त्याच्याच नेतृत्वात केकेआरने 2012 आणि 2014 साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर आता गंभीर केकेआरच्या मेंटॉरची भूमिका बजावत आहे.

केकेआर आणि सीएसके यांच्यातील आत्तापर्यंतच्या आमने-सामने आकडेवारीबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्यात 30 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 19 सामन्यांत चेन्नईने विजय मिळवला आहे आणि 10 सामन्यांत कोलकाताने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.