Gautam Gambhir : ...तर बीसीसीआयचा 'तो' सर्वात खराब निर्णय ठरला असता; गौतम गंभीर कशाबद्दल बोलतोय?

Gautam Gambhir
Gautam Gambhir esakal
Updated on

Gautam Gambhir : इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम काही महिन्यात सुरू होत आहे. आयपीएलची सुरूवात 2008 मध्ये झाली होती. त्यानंतर आयपीएल प्रत्येक हंगामागणिक यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहत आहे. कमाईच्या बाबतीत देखील आयपीएल आपलेच रेकॉर्ड सातत्याने मोडत आहे.

आयपीएलमुळे देशांतर्गत क्रिकेटला देखील बळकटी मिळाली आहे. अनेक स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मिळत आहे. त्यामुळे भारताची पुढची पिढी तयार होण्यास मदत होते. दरम्यान, गौतम गंभीरने आयपीएल संदर्भात आपले मत व्यक्त केलं आहे.

Gautam Gambhir
Hardik Pandya : पांड्या IPL ला मुकणार ही अफवा; अफगाणिस्तानविरूद्ध करणार भारतीय संघाचं नेतृत्व?

स्पोट्सकीडाच्या यूट्यूब चॅलनवर गौतम गंभीरला एक प्रश्न विचारण्यात आला होता. गंभीरला विचारण्यात आलं की जर बीसीसीआयने आयपीएलची सुरूवातच केली नसती तर काय झालं असतं?

या प्रश्नाचं उत्तर देताना गंभीर म्हणाला, 'मला असं वाटतं की जर बीसीसीआयने आयपीएल सुरू केलं नसतं तर तो बीसीसीआयचा सर्वात खराब निर्णय असता.'

अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2024 चा हंगाम हा 22 मार्च ते मे महिन्याच्या शेवटपर्यंत खेळला जाईल. आयपीएलचा हंगाम कधी सुरू होणार हे लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखेवर ठरणार आहे.

Gautam Gambhir
शाहू मैदानावर फुटबॉल सामन्यात हुल्लडबाजी! समर्थकांनी फेकल्या माव्याच्या थुंकीने भरलेल्या बाटल्या, दगड; पोलिसांचा लाठीमार

यंदाच्या 19 डिसेंबरला झालेल्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रूपयला खरेदी केलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.