IPL 2024 KKR vs DC : कोलकत्याचा दिल्लीवर शानदार विजय ; वरुण चक्रवर्ती अन् फिल सॉल्ट प्रभावी

वरुण चक्रवर्तीची (३/१६) प्रभावी फिरकी गोलंदाजी आणि फिल सॉल्टच्या आक्रमक ६८ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकता नाईट रायडर्सने सोमवारी येथे झालेल्या आयपीएल लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर सात विकेट राखून शानदार विजय मिळवला.
IPL 2024 KKR vs DC
IPL 2024 KKR vs DC sakal
Updated on

कोलकता : वरुण चक्रवर्तीची (३/१६) प्रभावी फिरकी गोलंदाजी आणि फिल सॉल्टच्या आक्रमक ६८ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकता नाईट रायडर्सने सोमवारी येथे झालेल्या आयपीएल लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर सात विकेट राखून शानदार विजय मिळवला. कोलकता संघाचा हा सहावा विजय ठरला. दिल्लीला सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

दिल्लीकडून कोलकतासमोर १५४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. हे आव्हान मोठे नसले तरी फॉर्ममध्ये असलेला सुनील नारायण १५ धावांवर व तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला रिंकू सिंग ११ धावांवर बाद झाला; पण त्याआधी फिल सॉल्ट व नारायण या सलामी जोडीने ७९ धावांची आश्‍वासक भागीदारी करताना कोलकता संघाला विजयाच्या दिशेने नेले. सॉल्टने ३३ चेंडूंमध्ये सात चौकार व पाच षटकारांसह ६८ धावांची मौल्यवान खेळी साकारली.

अक्षर पटेलने नारायण व सॉल्ट यांना बाद करीत दिल्लीच्या आशा पल्लवित केल्या. लिझाड विल्यम्स रिंकूला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद ३३ धावा) व व्यंकटेश अय्यर (नाबाद २६ धावा) या जोडीने कोलकत्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

IPL 2024 KKR vs DC
IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

दरम्यान, त्याआधी दिल्लीच्या फलंदाजांना सूर गवसला नाही. कर्णधार रिषभ पंतने २७ धावा केल्या. स्टार फलंदाजांकडून सपशेल निराशा झाली. कुलदीप यादवने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करीत नाबाद ३५ धावांची खेळी केल्यामुळे दिल्लीला १५३ धावांपर्यंत मजल मारता आली. वरुण चक्रवर्तीसह वैभव अरोरा व हर्षित राणा यांनीही प्रभावी गोलंदाजी केली.

संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स - २० षटकांत ९ बाद १५३ धावा (रिषभ पंत २७, कुलदीप यादव नाबाद ३५, वरुण चक्रवर्ती ३/१६, हर्षित राणा २/२८) पराभूत वि. कोलकता नाईट रायडर्स - १६.३ षटकांत ३ बाद १५७ धावा (फिल सॉल्ट ६८, श्रेयस अय्यर नाबाद ३३, व्यंकटेश अय्यर नाबाद २६, अक्षर पटेल २/२५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.