गुरु नेहराजींनी क्वालिफायर सामन्या आधी यजुवेंद्र चहलला दिला अनोखा प्रसाद

गुरु नेहराजींनी क्वालिफायर सामन्या आधी यजुवेंद्र चहलला दिला अनोखा प्रसाद
gt vs rr qualifier ipl 2022 ashish nehra kicked yuzvendra chahal
gt vs rr qualifier ipl 2022 ashish nehra kicked yuzvendra chahal
Updated on

आयपीएलच्या हंगामातील प्लेऑफचा पहिला सामना आज खेळल्या जाणार आहे. क्वालिफायर-1 सामना नवीन IPL संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना रंगणार आहे. सामन्यापूर्वी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. गुजरात संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा राजस्थान संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलला लाथ मारताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(ashish nehra kicked yuzvendra chahal)

गुजरात फ्रेंचायझीने नेहरा आणि चहलचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये नेहरा चहलसोबत विनोद करताना दिसत आहे. फोटोंमध्ये नेहरा आणि चहलसोबत गुजरात टीमचा स्टार स्पिनर राशिद खानही दिसत आहे. नेहराजींनी चहलला आशीर्वाद दिला आहे असे फोटो कॅप्शनमध्ये फ्रेंचाइजीने लिहले आहे.

gt vs rr qualifier ipl 2022 ashish nehra kicked yuzvendra chahal
तेल लावलेला पहिलवान आणि युपीचा बाहुबली; काय आहे व्हायरल फोटो मागचं रहस्य

दोन्ही संघांसाठी हा क्वालिफायर सामना खूप महत्त्वाचा आहे. सामना जिंकणारा एक संघ थेट फायनला जाईल. आणि दुसरा पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल. पराभूत संघाला अंतिम फेरीसाठी एलिमिनेटर लखनौ सुपर जायंट्स किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मधील विजेत्यांविरुद्ध क्वालिफायर-2 खेळावे लागेल.

गुजरात हा हंगामातील नवा संघ आहे, तर राजस्थानने एकदाच विजेतेपद मिळवले आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात म्हणजेच २००८ मध्ये राजस्थानचा संघ चॅम्पियन झाला होता. राजस्थान आणि गुजरात यांच्यातील हा दुसरा सामना आहे. याआधी या हंगामामध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात गुजरात संघाने राजस्थानचा ३७ धावांनी पराभव केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.