IPL 2024 GT vs RR : 'खेळपट्टीशी काहीही संबंध नाही...', लाजिरवाण्या पराभवानंतर गिलने या दोन खेळाडूंवर फोडलंं पराभवाचं खापर

IPL 2024 GT vs RR Shubman Gill : गेल्या दोन हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या गुजरात टायटन्सची अवस्था यंदाच्या हंगामात बिकट होत चालली आहे. बुधवारी आयपीएल 2024 च्या 32 व्या सामन्यात गुजरातला दिल्ली कॅपिटल्सकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
IPL 2024 GT vs RR Shubman Gill
IPL 2024 GT vs RR Shubman Gill Newssakal
Updated on

IPL 2024 GT vs RR Shubman Gill : गेल्या दोन हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या गुजरात टायटन्सची अवस्था यंदाच्या हंगामात बिकट होत चालली आहे. बुधवारी आयपीएल 2024 च्या 32 व्या सामन्यात गुजरातला दिल्ली कॅपिटल्सकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्यात गुजरात टायटन्सची फलंदाजी खूपच खराब झाली. 89 धावा करून संपूर्ण संघ ऑलआऊट झाला. यानंतर शुभमन गिलच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या लाजिरवाण्या पराभवानंतर गिलने स्वत:शिवाय अन्य दोन खेळाडूंवर पराभवाचं खापर फोडलंं.

IPL 2024 GT vs RR Shubman Gill
IPL 2024 Impact Player : 'इम्पॅक्ट प्लेअर' नियमामुळे अष्टपैलू खेळाडू मरतोय? अन् टीम इंडियाला बसतोय फटका

शुभमन गिलच्या मते, गुजरात टायटन्सच्या दारूण पराभवासाठी खेळपट्टी जबाबदार नाही. ती खरोखर चांगली होती. हा सगळा दोष फलंदाजांचा आहे. सामना संपल्यानंतर तो म्हणाला की, आमची फलंदाजी खूपच सरासरी होती. विकेट चांगली असली तरी आम्ही ज्या पद्धतीने आऊट झालो ते बघितले तर त्याचा खेळपट्टीशी काहीही संबंध नव्हता. मी, वृध्दिमान साहा आणि साई सुदर्शन ज्या प्रकारे बाद झालो, ती खराब शॉट निवड होती.

IPL 2024 GT vs RR Shubman Gill
Team India Squad : 20 खेळाडूंची नावे आली समोर... T20 World Cup मध्ये कोणाला मिळणार संधी?

तो पुढे म्हणाला की, आम्ही चांगली फलंदाजी केली नाही त्यामुळे आम्ही धावा स्कोअर बोर्डवर लावू शकलो नाही आणि सामना गमावला. 89 धावा ही मोठी धावसंख्या नाही. एवढ्या धावसंख्येवर विजय मिळवण्यासाठी गोलंदाजांना दुहेरी हॅट्ट्रिक घ्यावी लागेल, तरच गोष्टी कामी येताना दिसतील. अजून अर्धा हंगाम राहिला आहे आणि आम्ही आधीच 3 सामने जिंकले आहेत. आशा आहे की, गेल्या काही वर्षांप्रमाणे आम्ही उत्तरार्धात सातपैकी आणखी 5-6 सामने जिंकू.

IPL 2024 GT vs RR Shubman Gill
Rishabh Pant GT vs DC : पंत इज बॅक! स्वागत नही करोगे हमारा... धोनीसारखी चपळाई दाखवत निवडसमितीला केलं खूश, पाहा Video

या पराभवानंतर गुजरात टायटन्स आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. सातपैकी चार सामने गमावल्यानंतर गिलच्या संघाचे 6 गुण आणि निव्वळ धावगती -1.303 आहे. आता प्लेऑफमध्ये पात्र ठरणे त्याच्यासाठी खूप कठीण काम झाले आहे. मात्र, पुढील किमान 5 सामने ते जिंकतील, असा गिलला आशा आहे. या मोसमात गुजरात टायटन्सचे नशीब काय होते हे पाहणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.