IPL 2024: सुरक्षेच्या कारणाने नाही, तर यामुळे RCB ने एलिमिनेटर आधी रद्द केलेली प्रॅक्टिस

RCB Practice Session: एलिमिनेटर सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सराव सत्र रद्द केलं होतं.
RCB | IPL
RCB | IPLSakal
Updated on

RCB Practice Session: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघात अहमदाबादला खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळवारी होणारे सराव सत्र रद्द केले होते.

दरम्यान, बंगळुरूने सराव सत्र रद्द करण्यामागे सुरक्षेची भीती असल्याचे म्हटले जात होते. सोमवारी रात्री गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने अहमदाबादच्या विमानतळावरून चार संशयीत दहशतवाद्यांना अटक केल्याचे समजले होते.

त्यानंतर त्याबाबत राजस्थान आणि बंगळुरू संघाला याबाबत माहिती देण्यात आली होती. तसेच आयपीएल संघांच्या आणि सामन्यांची सुरक्षाही कडक करण्यात आली.

RCB | IPL
Vijay Mallya: 'कर्ज घेताना नेमकं काय वाटत होतं?', विराट अन् RCB बाबत त्या ट्वीटवर विजय मल्ल्या ट्रोल

अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार प्राथमिक अंदाज असा व्यक्त करण्यात आला होता की विराटच्या आणि संघाच्या सुरक्षेच्या कारणाने बंगळुरूने सराव सत्र रद्द केले आहे. पण आता असे समोर येत आहे की उष्णतेच्या कारणाने बंगळुरूने सराव रद्द केला होता.

आनंदबाझार पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार गुजरात पोलीस अधिकाऱ्यांनी कल्पना दिली होती की बंगळुरूने त्यांचे सराव सत्र रद्द करण्यामागे आणि दोन्ही संघांची पत्रकार परिषद रद्द करण्यामागे प्राथमिक कारण विराट कोहलीच्या जीवाला धोका, हे आहे.

दरम्यान, त्यांनी असेही सांगितले होते की बंगळुरू संघाने सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवले होते की ते सराव करणार नाहीत, पण त्यांनी यामागील कारण स्पष्ट केले नव्हते.

आता गुजरात क्रिकेट असोसिएशनने सुरक्षेच्या भीतीने बंगळुरूने सराव रद्द करण्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी माहिती दिली आहे की हल्ल्याची कोणतीही भीती नाही.

RCB | IPL
Sandeep Lamichhane : बलात्काराच्या आरोपातून मुक्तता मात्र व्हिसा नाकारला! संदीपसाठी टी20 वर्ल्डकपचं दार बंदच

तसेच क्वालिफायर वन सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी झाल्याने राजस्थान आणि बंगळुरूसाठी गुजरात कॉलेज ग्राऊंडवर सरावासाठी पर्याय उपलब्ध करून दिला होता. तसेच बंगळुरू दुपारी 2-5 सराव करणार होते, नंतर त्यांनी वेळ बदलून दुपारी 3-6 केली होती. कारण 6.30 पर्यंत चांगला उजेड असतो.

पण नंतर राजस्थान रॉयल्सने 3.30 ते 6.30 सराव केला. तसेच त्यांनी सांगितले की बंगळुरूने सराव रद्द केला कारण शहरात उष्णतेची लाट होती. आरसीबीला उष्णतेच्या कारणाने सराव करायचा नव्हता.

दरम्यान, राजस्थान आणि बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता चालू होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करेल, तर पराभूत संघाचे आव्हान संपेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()