Gujarat Titans New Jersey : मुंबईकडून हरणारी हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स पुढच्या सामन्यात बदलणार जर्सी

Gujarat Titans New Jersey
Gujarat Titans New Jerseyesakal
Updated on

Gujarat Titans New Jersey : गतविजेता गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सने 27 धावांनी मात देत आपले प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवले. गुजरातने मुंबईचा पराभव केल्यानंतर आता हार्दिकच्या संघाला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी सनराईजर्स हैदराबाद विरूद्धचा 15 मे रोजी होणारा सामना जिंकावा लागणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यासाठी गुजरात टायटन्सने आपल्या जर्सीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gujarat Titans New Jersey
Virat Kohli Captaincy : कर्णधार म्हणून मी खूप चुका केल्या... विराट कोहलीने दिली प्रांजळ कबुली

15 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात गुजरात टायटन्स कॅन्सविरूद्ध जनजागृती करण्यासाठी फिक्या लवेंडर रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. याबाबतची घोषणा गुजरातन आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून केली. यामध्ये गुजरात टायटन्स म्हणते की, 'आम्ही विशेष कारणासाठी सोमवारी लव्हेंडर रंगातील जर्सी घालून मैदानात उतरण्यास सज्ज झालोय. गुजरात टायटन्स प्रत्येकाच्या आरोग्य आणि तंदुरूस्तीसाठी सजग आहे. कॅन्सरविरूद्ध जनजागृती करण्यासाठी आमच्यासोबत या. #GTvsSRH'

Gujarat Titans New Jersey
WTC Final 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली WTC फायनलमध्ये हा खेळाडू बनणार टीम इंडियाचा उपकर्णधार!

गुजरात टायटन्स सध्या आयपीएल पॉईंट टेबलमध्ये 8 सामने जिंकत 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गुजरातचा नुकत्याच झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 27 धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने सूर्यकुमारच्या शतकी (नाबाद 103) खेळीच्या जोरावर 218 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. गुजरातकडून राशिद खानने 30 धावात 4 विकेट्स घेत चमक दाखवली.

त्यानंतर 219 धावांचे आव्हान चेस करताना देखील राशिद खानने झुंजारपणा दाखवला. गुजरातची अवस्था 8 बाद 103 धावा अशी झाली असताना राशिद खानने 32 चेंडूत नाबाद 79 धावा ठोकल्या. डेव्हिड मिलरनेही 41 धावांची खेळी केली. यामुळे मुंबईचा मोठ्या धावांनी विजय मिळवण्याचा मनसुबा उधळला गेला. मुंबईकडून आकाश माधवालने 31 धावात 3 तर पियुष चावलाने 36 धावात 2 बळी टिपले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.