GT vs MI Playing 11 : पंजाबकडून धुलाई झालेली मुंबई आपली प्लेईंग 11 बदलणार?

GT vs MI Playing 11
GT vs MI Playing 11 esakal
Updated on

GT vs MI Playing 11 : पहिल्या दोन पराभवानंतर पुन्हा फॉर्ममध्ये आलेल्या मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्जने पराभवाचा धक्का दिला. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकात 96 धावांची लयलूट केली. नंतर मुंबईच्या फलंदाजांनी पंजाबच्या 214 धावांचा पाठलाग करताना 201 धावांपर्यंत मजल मारली खरी मात्र मुंबईला विजय मिळवण्यासाठी 13 धावा कमी पडल्या.

आज मुंबई इंडियन्सचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. आजच्या सामन्यात मुंबईला आपली स्लॉग ओव्हरमधील गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. मुंबईचे वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरनडॉर्फ, कॅमरून ग्रीन, जोफ्रा अर्चर या सर्वांनी पंजाबविरूद्ध 40 च्या वर धावा दिल्या. फक्त पियुष चावला आणि ऋतिक शौकीन यांनी चांगली गोलंदाजी केली होती.

GT vs MI Playing 11
WTC Team India Squad: 15 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! रहाणे पुन्हा एकदा संघात सुर्या बाहेर

फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मुंबईची फलंदाजी आता बहरू लागली आहे. रोहित शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना सूर सापडला असून ग्रीन देखील मोठी खेळी करत आहे. त्यामुळे मुंबईच्या संघात गुजरातविरूद्ध जर कोणता बदल झाला तर तो गोलंदाजी विभागात विशेषकरून वेगवान गोलंदाजीमध्ये होऊ शकतो.

गुजरातच्या प्लेईंग 11 बद्दल बोलायचे झाले तर गुजरातच्या देखील गोलंदाजीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. यंदाच्या हंगामात गुजरातला धावसंख्येचा बाचाव करण्यात फारसे यश आलेले नाही. मात्र त्यांनी लखनौविरूद्धच्या सामन्यात धावांचा चांगला बचाव केला होता.

गुजरातच्या गोलंदाजांनी स्लॉग ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली. मोहित शर्माने शेवटच्या षटकात 12 धावा हव्या असताना चांगला मारा करत सामना जिंकून दिला. दुसरीकडे अनुभवी मोहम्मद शमी देखील विकेट्स घेण्यात अग्रेसर आहे.

GT vs MI Playing 11
IPL 2023 David Warner: आधी कर्णधारपदावरून काढले नंतर संघातून वगळले! डेव्हिड वॉर्नरने उगवला सूड; पहा VIDEO

गुजरात vs मुंबई हेड टू हेड

सामना 1, मुंबईने जिंकलेले सामने - 1, गुजरातने जिंकलेले सामने - 0

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11 :

रोहित शर्मा, तिलक वर्मा, इशान किशन, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वधेरा, ऋतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरनडॉर्फ

इम्पॅक्ट प्लेअर : विष्णू विनोद, रमनदीप सिंह, पियुष चावला, शम्स मुल्लानी

गुजरात टायट्नस प्लेईंग 11 :

शुभमन गिल, वृद्धीमान साहा, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, हार्दिक पांड्या, अभिनव मनोहर, विजय शंकर, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर मोहम्मद, मोहित शर्मा

इम्पॅक्ट प्लेअर : साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, शिवम मावी

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()