आपीएलचा १६ वा सिझन सुरू आहे. आयपीएलच्या माध्यमातून माजी प्लेअर देखील पाहायला मिळतात. एक व्हिडिओमध्ये श्रीसंत म्हणाला तो प्रत्येक टेस्ट मॅचपूर्वी हरभजन सिंगची गळाभेट घेत असे. हे ऐकून वीरेंद्र सेहवाग हसायला लागला. त्याने हरभजन आणि श्रीसंतची चांगलीच मजा घेतली.
सेहवाग म्हणाला हे सर्व २००८ च्या मोहालीतील थप्पड कांड नंतर सुरू झाले. यावेळी सेहवाग आयपीएलमधील थप्पड मारण्याच्या घटनेचा संदर्भ देत होता. हे खेळाडू स्टार स्पोर्टवर एका चर्चासत्रात बोलत होते.
मोहातील कांड झाले तेव्हापासून श्रीसंत हरभजनची गळाभेट घेतो, असे सेहवाग म्हणताच चर्चा पॅनेलमध्ये उपस्थित असलेला युसूफ पठाण जोरजोरात हसायला लागला.
यावेळी हरभजन सिंग म्हणाला, ते सर्व विसरा यार...तर श्रीसंत म्हणाला त्या घटनेआधी देखील तो हरभजनची गळाभेट घेत होता. यानंतर हरभजन आणि श्रीसंतने हस्तांदोलन केले. हरभजन सिंग, यूसुफ पठान एस श्रीसंत आणि विरेंद्र सेहवाग २०११ मध्ये जिंकलेल्या वर्ल्डकपवर चर्चा करत होते. त्यावेळी हा किस्सा घडला.
जेव्हा भज्जीचा संयम सुटला होता -
आयपीएलच्या पहिल्या सत्रात म्हणजेच २००८ मध्ये हरभजन सिंगने मॅचनंतर एस श्रीसंतला थप्पड मारली होती. या घटनेनंतर श्रीसंत ढसाढसा रडला होता. हा सामना मोहालीत खेळला गेला होता.
हा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबने (आता पंजाब किंग्ज) ६६ धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग होता. त्याच वेळी हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. यानंतर भज्जीवर आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉककडे होते.
श्रीसंतला थप्पड मारल्याबद्दल हरभजन सिंगने अनेक वेळा श्रीसंतची माफी मागितली आहे. एकदा त्यांनी असंही म्हटलं होतं की, जर मला काही चूक सुधारण्याची संधी मिळाली तर तो नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.