Hardik Pandya : घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिक पांड्या कुठे झाला गायब? टी-20 वर्ल्ड कपसाठी गेला नाही संघासोबत

Hardik Pandya T20 World Cup 2024 : टीम इंडिया आता आगामी वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे टीम इंडिया 25 तारखेला अमेरिकेला रवाना झाली आहे.
Hardik Pandya T20 World Cup 2024
Hardik Pandya T20 World Cup 2024sakal
Updated on

Hardik Pandya T20 World Cup 2024 : टीम इंडिया आता आगामी वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे टीम इंडिया 25 तारखेला अमेरिकेला रवाना झाली आहे. पहिल्या बॅचमध्ये कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, मोहम्मद सिराज आणि इतर खेळाडू उपस्थित होते.

या काळात टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या टीमसोबत नव्हता. दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

Hardik Pandya T20 World Cup 2024
Eng vs Pak : आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडपुढेही पाकिस्तान नतमस्तक; बटलरच्या संघाने बाबरच्या टीमला आणले रडकुंडी

वृत्तानुसार, हार्दिक पांड्या देखील टीम इंडियाच्या पहिल्या तुकडीसह निघणार होता, कारण त्याची टीम मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफमधून बाहेर पडणारी पहिली टीम होती. टीम इंडियाच्या पहिल्या बॅचमध्ये मुंबई इंडियन्सचे तीन खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव बाहेर पडले आहेत.

मागील काही महिने हार्दिकसाठी खूप वाईट गेले आहेत. त्यानंतर आता त्याच्या आणि नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. मात्र, हार्दिक आणि नताशाकडून याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

Hardik Pandya T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 : कोहली-पांड्या टीम इंडियासोबत का गेले नाहीत अमेरिकेला? मोठे कारण आले समोर

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिक पांड्या कुठे झाला गायब?

काही बातम्यांनुसार, हार्दिक पांड्या सध्या लंडनमध्ये आहे. पांड्या 1 जूनपर्यंत टीम इंडियामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. 1 जून रोजी टीम इंडिया बांगलादेशसोबत एकमेव सराव सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी हार्दिक टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो.

टीम इंडिया 5 जूनपासून टी-20 वर्ल्डकपमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना न्यूयॉर्कमध्ये आयर्लंडसोबत होणार आहे. यानंतर याच मैदानावर टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.