Hardik Pandya: आयपीएलच्या क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने फायनलमध्ये प्रवेश केल्यावर आपल्या खेळाडूंचे कौतुक केले आहे. रॉयल्सच्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड मिलरने ६८ आणि पांड्याने ४० धावा करत चौथ्या विकेटसाठी १०६ धावांच्या भागीदारी केली, आणि टायटन्सला ७ गडी राखुन मोठा विजय मिळवून दिला.
मिलरने ३८ चेंडूंत पाच षटकार आणि तीन चौकार मारले, शेवटच्या षटकात सलग तीन षटकार मारून त्याने विजय मिळवून दिला. पांड्याने २७ चेंडूंचा सामना करत पाच चौकार मारले. जोस बटलरच्या ८९ आणि कर्णधार संजू सॅमसन ४७ धावांच्या जोरावर रॉयल्सने ६ बाद १८८ धावा केल्या.
सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, गुजरात टायटन्सचा संघ पहिल्याच आयपीएल हंगामामध्ये फायनलला आला आहे. तरी पण मला कोणत्या भावना मनात आली नाही. मुंबई इंडियन्सकडून मी चार विजेतेपद फायनल खेळलो आहे, आणि कधी फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला नाही.
संघातील सर्व २३ खेळाडू मला अभिमान आहे. प्लेइंग इलेव्हनमधील सर्व खेळाडूने चांगली कामगिरी करावी असं संघाला वाटत होत. रशीदने संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली, पण मला मिलरचा अधिक अभिमान वाटतो.
रॉयल्सचा कर्णधार सॅमसन म्हणाला की, सामन्यात धावसंख्या झाल्या त्यावर आम्ही खूश होतो. पण नाणेफेकीने या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पॉवरप्लेमध्ये चेंडू स्विंग होत होता, तर कधी थांबून येत होता. त्यामळे विकेटवर फलंदाजी करणे तितके सोप नव्हत. आम्ही पॉवरप्लेमध्ये काही धावा करू शकलो भाग्य होत. अशा परिस्थितीत ही चांगली धावसंख्या होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.