Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Hardik Pandya
Hardik Pandya LSG vs MI esakal
Updated on

Hardik Pandya Golden Duck LSG vs MI IPL 2024 : बीसीसीआयने आज 1 जूनपासून होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारताचा संघ घोषित केला. आयपीएल सुरू होण्यापूर्वी आणि सूरू झाल्यानंतर भरपूर चर्चा झालेल्या हार्दिक पांड्याला अखेर संघात स्थान मिळालं. कर्णधारपद नाही मात्र उपकर्णधारपद पांड्यानं पदरात पाडून घेतलं.

मात्र संघ जाहीर होताच अवघ्या काही तासातच हार्दिक पांड्यानं निराशा केली. लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने गोल्डन डक मिळवला. तिलक वर्मा धावबाद झाल्यानंतर पुढच्या चेंडूवर नवीन उल हकने मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याची शिकार केली.

Hardik Pandya
T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी करत मुंबईची अवस्था 4 बाद 27 धावा अशी केली होती. मोहसीन खानने रोहित शर्माला 4 धावांवर बाद केलं. त्यानंतर आलेला सूर्यकुमार एक षटकार मारून स्टॉयनिसची शिकार झाला. पाठोपाठ फॉर्ममध्ये असलेला तिलक वर्मा देखील धावाबाद झाला. मुंबईची अवस्था 3 बाद 27 धावा अशी झाली होती.

पहिल्या पाच षटकात तीन फलंदाज गमावल्यानंतर आता मुंबईची सर्व मदार ही कर्णधार हार्दिक पांड्यावर होती. मात्र पुढच्या चेंडूवर तो नविन उल हकच्या गोलंदाजीवर केएल राहुलकडं झेल देऊन भोपळाही न फोडता परतला.

Hardik Pandya
KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

हार्दिक बाद झाल्यानंतर मात्र त्यानंतर इशान किशन आणि नेहलने 53 धावांची भागीदारी रचत मुंबईला 80 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र इशान किशन 32 धावा करून बाद झाला. त्यानंतर नेहल देखील 46 धावा करून पॅव्हेलियनमध्ये पोहचला. टीम डेव्हिडने स्लॉग ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी करत 18 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. या जोरावर मुंबईने लखनौसमोर 145 धावांच आव्हान ठेवलं.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.