Hardik Pandya IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल 2024 चा चौदावा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबई या हंगामातील पहिला सामना घरच्या मैदानावर खेळत आहे.
मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या हातात आहे, पण शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी हार्दिकला खूप ट्रोल केले होते. दुसरीकडे चाहत्यांनी हार्दिकपेक्षा रोहित शर्माला जास्त पाठिंबा दिला होता.
आणि शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये हार्दिकला ट्रोल तर रोहितला सपोर्ट करण्यासाठी अनेक प्रेक्षक स्टेडियममध्ये आले होते, मात्र आता हार्दिक पांड्याविरुद्ध बोला तर होणार मोठी कारवाई होऊ शकते. यासाठी मुंबईने नवीन नियमावली लागू केलं आहे.
वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या होम मॅचमध्ये हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या नाराजीपासून वाचवण्यासाठी संघाने चाहत्यांसाठी काही नियम जारी केले आहेत.
मुंबई इंडियन्सच्या मागील दोन सामन्यांमध्ये चाहत्यांनी हार्दिक विरोधात जोरदार शिवीगाळ केली होती. अशा परिस्थितीत एमआय विरुद्ध आरआर सामन्याच्या आधी, फ्रँचायझीने चाहत्यांसाठी टिप्स जारी केल्या आहेत.
अनेक नियमांपैकी काही नियम असे आहेत जे विशेषतः हार्दिक पांड्यासाठी ठेवण्यात आले आहेत. हार्दिक पांड्याला त्रास होणार नाही याची खात्री करण्यासाठी, हे तीन नियम विशेषतः लागू केले गेले आहेत. आक्षेपार्ह चिन्हे, आक्षेपार्ह/धमकीदायक आचरण, भेदभाव करणारी भाषा किंवा हावभाव.
त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर कर्णधार हार्दिक पांड्याला पाठिंबा मिळू शकतो. ज्या प्रेक्षकांनी रोहित शर्माचे समर्थन करणारे आणि हार्दिकला ट्रोल करणारे पोस्टर लावले होते, त्यांना आता मैदानात नेता येणार नाही. अशी सर्व पोस्टर्स मैदानाबाहेर लावण्यात आली आहेत. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.