Hardik Pandya Somnath Temple : अडचणीत सापडलेल्या पांड्याची महादेवाच्या चरणी धाव; सोमनाथ मंदिरातील Video व्हायरल

Hardik Pandya
Hardik Pandya Prayer Somnath Templeesakal
Updated on

Hardik Pandya Somnath Temple Video : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याने संघाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून संघानं विजय पाहिलेला नाही. आयपीएल 2024 च्या हंगामातील सलग तीन सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे.

याचबरोबर हार्दिक पांड्याला प्रत्येक मैदानावर प्रेक्षकांच्या हूटिंगला सामोरे जावे लागत आहे. मुंबईचे चाहते त्याच्याविरूद्ध प्रचंड नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याने सोमनाथ मंदिरात शंकराची प्रार्थना केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Hardik Pandya
SRH vs CSK IPL 2024 : माक्ररमचे अर्धशतक तर अभिषेकचा तडाखा; हैदराबादचा चेन्नईवर सहज विजय

मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढच झाली आहे. रोहितला हटवल्यामुळे चाहते नाराज आहेत. त्यात हंगामाची सुरूवात खराब झाली आहे. वैयक्तिक कामगिरी देखील म्हणावी तशी होत नाहीये. ना गोलंदाजीत ना फलंदाजीत पांड्या आपल्या लौकिकास साजेसा खेळ करतोय.

त्यात त्याचा सर्वोत्कृष्ट फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२४ च्या मोसमात एकही सामना खेळलेला नाही. जेसन बेहरेनडॉर्फ आणि दिलशान मदुशंका हे दोन परदेशी वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो आत्तापर्यंत गेलेल्या प्रत्येक मैदानावर प्रेक्षकांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

Hardik Pandya
SRH vs CSK: चेन्नई संघात मुस्तफिजूरच्या जागेवर कोण खेळणार? 'हे' चार गोलंदाज प्रबळ दावेदार

दरम्यान, हार्दिक पांड्या सोमनाथ मंदिरात पूजा करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अडचणीत सापडलेल्यावर सहसा देवाला साकडं घातलं जातं. हार्दिक देखील मुंबईची अन् पर्यायानं स्वतःची नय्या पार लावण्यासाठी शंकराच्या चरणी लीन झाला. हा व्हिडिओ सोमनाथ मंदिराकडूनच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना हा दिल्ली कॅपिटल्स सोबत वानखेडे स्टेडियमवर 7 एप्रिलला होणार आहे. दिल्लीनं चेन्नईचा पराभव करत आपली गाडी विजयी मार्गावर आणली आहे. मात्र त्यांना केकेआरकडून 106 धावांनी पराभव सहन करावा लागला. आता तळातील दोन्ही संघात लढत होत असून मुंबईला आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.