Hardik Pandya Statement After MI vs CSK IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील 29 वा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी निश्चितच अविस्मरणीय ठरला. या सामन्यात जिथे एमएस धोनीच्या बॅटमधून सलग तीन षटकार दिसले, तिथे रोहित शर्माने 2012 नंतर आयपीएलमध्ये शतक ठोकले.
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्याचा शेवटही अतिशय रोमांचक झाला. सीएसकेने हा सामना 20 धावांनी जिंकला ज्यामध्ये मथिशा पाथिरानाने 4 विकेट घेत विजयात मोठी भूमिका बजावली. या सामन्यात मुंबईच्या पराभवानंतर त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्याने महेंद्रसिंग धोनीला याचं मुख्य कारण ठरवलं.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, 'लक्ष्य नक्कीच गाठता आले असते, पण त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. मथिसा पाथिराना हा विजय आणि पराभव यातील फरक ठरला. त्यांच्याकडे विकेटच्या मागे एक व्यक्ती आहे. जो त्यांना सांगत असतो की या विकेटवर काय केले पाहिजे जे योग्य असेल आणि यामुळे गोलंदाजांना खूप मदत होते. या खेळपट्टीवर चेंडू थोडासा थांबून येत होता. आम्ही चांगली फलंदाजी करायला हवी होती. पहिल्या षटकात पाथिरानाने दोन विकेट्स घेईपर्यंत आम्ही पुढे होतो. आम्ही पुढील चार सामन्यांसाठी सज्ज आहोत, चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे.
पांड्या पुढे म्हणाला की, आता आम्हाला पुढील चार सामने घरापासून दूर खेळायचे असून त्यात अधिक चांगले खेळण्यावर भर द्यावा लागेल. या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघ 6 सामन्यांतील 4 पराभवानंतर गुणतालिकेत 8 व्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये त्याचा निव्वळ धावगती देखील -0.234 आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.