Hardik Pandya : पांड्या याच हंगामात करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व... भारताच्या माजी खेळाडूचं मोठं विधान

Hardik Pandya
Hardik Pandyaesakal
Updated on

Hardik Pandya Mumbai Indians Captain : आयपीएल 2024 आणि मुंबई इंडियन्ससाठी 26 नोव्हेंबर 2023 हा दिवस खूप मोठा ठरला. गुजरात टायटन्सला पहिल्या हंगामातच विजेत्या आणि दुसऱ्या हंगामात उपविजेत्या पदापर्यंत नेणारा कर्णधार हार्दिक पांड्याची होय - नाही करत अखेर घरवापसी झाली. याबाबतचे वृत्त पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले.

या वृत्ताबरोबरच रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीबद्दलच्या देखील चर्चांना देखील उधाण आलं आहे. मुंबई इंडियन्सला तब्बल 5 विजेतेपदं मिळवून देणारा रोहित राहणार की जाणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात उभा राहिला आहे.

भारताचे माजी खेळाडू आणि निवडसमिती अध्यक्ष राहिलेले कृष्णमचारी श्रीकांत यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना मुंबई इंडियन्स 2024 च्या हंगामातच हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवेल असं मोठं विधान केलं.

Hardik Pandya
Shubman Gill : शुभमन गिल होणार गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार; भारतीय संघासाठी देखील अजून एक 'युवा' पर्याय?

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करायचं होतं. तशी इच्छा त्याने मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनासमोर बालून दाखवल्याची चर्चा कायम होते. आता गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिकने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं.

आता मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेडऑफ करून पुन्हा आपल्या संघात घेतलं. त्यांच्यामध्ये नेतृत्वासंदर्भात काय डील झाली आहे हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र माजी खेळाडू के श्रीकांत यांच्या मते 2024 मध्येच मुंबई इंडियन्स कर्णधारपदाची माळ हार्दिकच्या (Hardik Pandya) गळ्यात घालण्याची शक्यता आहे.

श्रीकांत म्हणाले की, 'मुंबई इंडियन्समधील नेतृत्व बदल हा व्यवस्थित आणि सहज पद्धतीने होईल. हा बदल सचिन आणि रोहित यांच्यादरम्यान देखील झाला होता. आता हार्दिक पांड्याबाबत देखील असंच होईल. मुंबई इंडियन्समधील नेतृत्व बदल हा सहज आणि शांततेत होईल.'

'शेवटी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील नातं चांगलं आहे. नक्कीच मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला कर्णधार करतील. या गोष्टी योग्यप्रकारे आणि व्यवस्थित पार पाडण्यात रोहित शर्माची मोठी भुमिका असेल.'

Hardik Pandya
IND Vs AUS 2nd T20 : युवा खेळाडूंचा धमाका! दूसऱ्या टी-20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाचं लोटांगण, बिष्णोई-कृष्णाचा कहर

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आपला पदार्पणाचाच हंगाम जिंकून विजेतेपद पटकावलं. त्यानंतर दुसऱ्या हंगामात देखील अंतिम फेरी गाठली.

आशिष नेहराच्या मार्गदर्शनाखाली हार्दिकने संघाचे चांगले नेतृत्व केले. त्यांच्या संघाने बेधडक क्रिकेट खेळलं. त्यांनी डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, मोहम्मद शमी, साई सुदर्शन आणि वृद्धीमान साहा यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली.

आयपीएलमधील घवघवीत यशानंतर हार्दिक पांड्याला भारतीय टी 20 संघाचा देखील कर्णधार करण्यात आलं. विशेष म्हणजे गुजरातने आपल्या यशस्वी कर्णधाराला जाऊ कसं दिलं हा प्रश्न क्रिकेट चाहते विचारत आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.