Harpreet Brar DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला 167 धावात रोखल्यावर दिल्लीने पहिल्या 6 षटकात नाबाद 65 धावा चोपल्या होत्या. मात्र त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजीला पंजाबच्या फिरकीची नजर लागली. दिल्लीचे एका पाठोपाठ एक फलंदाजी माघारी गेले. अखेर पंजाबने दिल्लीने 20 षटकात 8 बाद 136 धावांवर रोखत सामना 31 धावांनी जिंकला. पंजापकडून हरप्रीत ब्रारने 30 धावात 4 तर राहुल चाहर आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या विजयाबरोबरच पंजाबने आपले प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवले. ते आता 12 गुण घेत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहचले आहेत.
पंजाब किंग्जने प्रभसिमरन सिंगच्या दमदार शतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 168 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि फिल्प सॉल्ट यांनी 6.2 षटकात 69 धावांची सलामी दिली. इतकी दमदार सलामी पाहून दिल्ली हा सामना आरामात जिंकणार असे वाटत होते.
मात्र हरप्रीत ब्रारने सॉल्टला 21 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर राहुल चाहरने धोकादायक मिचेल मार्शला 3 धावांवर बाद केले. पुढच्याच षटकात ब्रारने रिली रूसोला 5 धावांवर बाद करत दिल्लीची अवस्था 3 बाद 81 अशी केली. दुसऱ्या बाजूला अर्धशतक करत डेव्हिड वॉर्नर एकाकी किल्ला लाढवत होता. मात्र याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ब्रारने 57 धावांची खेळी करणाऱ्या वॉर्नरची शिकार केली.
वॉर्नर बाद झाल्यानंतर दिल्लीची विजयाची आशा मावळत चालली. पंजाबच्या फिरकीपटूंनी दिल्लीच्या फलंदाजांना चांगलेच सतावले. अक्षर पटेल 1 तर मनिष पांडे 0 धावा करून बाद झाले. अक्षरला चाहरने तर पांडेला ब्रारने बाद केले. ब्रारची ही चौथी शिकार होती. यानंतर आलेल्या अमन खान प्रविण दुबे यांनी प्रत्येकी 16 धावांचे योगदान दिले. मा एलिसने या दोघांना बाद करत पंजाबला पराभवाच्या खाईत ढकलले. कुलदीप यादव (10) आणि मुकेश कुमारने (6) सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. मात्र त्यांना काही शेवटच्या षटकातील 37 धावा निघाल्या नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.