स्टार खेळाडूच्या पोस्टमुळे उडाली खळबळ, IPL 2024 मधून का घेतली माघार स्पष्टच सांगितलं...

IPL 2024 Season Delhi Capitals News : इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकने इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सतराव्या हंगामातून आपले नाव मागे घेण्याच्या निर्णयाने सर्वांनाच चकित केले आहे.
harry brook IPL 2024 Latest News Marathi
harry brook IPL 2024 Latest News Marathisakal
Updated on

IPL 2024 Season Delhi Capitals : इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकने इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सतराव्या हंगामातून आपले नाव मागे घेण्याच्या निर्णयाने सर्वांनाच चकित केले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने डिसेंबर 2023 मध्ये होणाऱ्या आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत ब्रूकला 4 कोटी रुपयांना आपल्या संघाचा भाग बनवले होते.

harry brook IPL 2024 Latest News Marathi
IPL 2024 : ऋषभ पंत आला मात्र... दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! संघाचा स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर

त्याच वेळी, ब्रूकने आता आयपीएल 2024 हंगामामध्ये न खेळण्याचे कारण उघड केले आहे, ज्यामध्ये त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 22 मार्चपासून आयपीएलचा 17वा सीझन सुरू होणार असून यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ पंजाब किंग्जविरुद्ध 23 मार्चला पहिला सामना खेळणार आहे.

harry brook IPL 2024 Latest News Marathi
Ranji Trophy Final रोमांचक वळणावर, शेवटच्या दिवशी विदर्भाला 290 धावा तर मुंबईला 5 विकेटचे समीकरण

हॅरी ब्रूकने आयपीएल 2024 मध्ये न खेळण्याबाबत इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले की, मला कळवायचे आहे की मी आयपीएलच्या आगामी हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, जो माझ्यासाठी खूप कठीण होता. यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. माझ्या या निर्णयाबद्दल मला वैयक्तिकरित्या कोणाला काही सांगण्याची गरज नव्हती, पण लोक विचारतील का, म्हणूनच मी याबद्दल सर्वांना सांगत आहे.

तो पुढे म्हणाला की, “गेल्या महिन्यात मी माझी आजी गमावली. माझ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि क्रिकेटवरील प्रेम हे त्यांनी आणि माझ्या दिवंगत आजोबांनी घडवले. मी माझे बालपण त्याच्या घरी घालवले. पण आता मी जेव्हा घरी जाईल तेव्हा ती नसेल.”

harry brook IPL 2024 Latest News Marathi
WPL 2024 : 5 षटकार... 7 चौकार... शेफाली वर्माची तुफानी खेळी अन् दिल्लीचा संघ थेट दुसऱ्यांदा फायनलमध्ये!

आताच इंग्लंड संघाचा भारत दौरा 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी आला होता. ज्यामध्ये भारतीय संघाने त्यांचा 4-1 अशा पराभव केला. हा दौरा सुरू होण्यापूर्वी हॅरी ब्रूक यूएईमध्ये इंग्लंड संघाच्या सराव शिबिरात सहभागी होता, परंतु त्यादरम्यान तो वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला.

मात्र, त्यावेळी या निर्णयाबाबत ईसीबीकडून फारशी माहिती देण्यात आली नव्हती. ब्रूक आयपीएलच्या शेवटच्या मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता, पण फलंदाजीत चांगली कामगिरी करू न शकल्याने संघाने त्याला सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.