IPL 2024 : ऋषभ पंत आला मात्र... दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! संघाचा स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर

IPL 2024 Delhi Capitals News : आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.
Harry Brook Withdraws From IPL 2024 Latest Marathi News
Harry Brook Withdraws From IPL 2024 Latest Marathi News sakal
Updated on

IPL 2024 Delhi Capitals : आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकने आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घेतले आहे. हॅरी ब्रूकला लिलावात फ्रँचायझीने 4 कोटी रुपयांना विकत घेतले होते, परंतु ब्रूकने वैयक्तिक कारणे सांगून स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Harry Brook Withdraws From IPL 2024 Latest Marathi News
Mohammed Shami Update : 'माझ्या शस्त्रक्रियेला 15 दिवस झाले अन् मी...' मोहम्मद शमीने दिली मोठी अपडेट

क्रिकबझच्या वृत्तानुसार, 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2024 च्या आधी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. हॅरी ब्रूकची अनुपस्थिती केवळ आयपीएलपर्यंतच नाही तर त्यानंतरही वाढू शकते, त्यामुळे इंग्लंडसाठी पण हा मोठा धक्का असु शकतो. हॅरी ब्रूक भारतातील कसोटी मालिकेतही इंग्लंड संघाचा भाग नव्हता. त्याने शेवटच्या क्षणी कसोटी संघातून आपले नाव मागे घेतले.

Harry Brook Withdraws From IPL 2024 Latest Marathi News
ICC Test Ranking : टाइगर का हुकुम... पुन्हा एकदा अश्विन बनला 'नंबर १'; रोहित अन् जैस्वालचीही 'यशस्वी' झेप

हॅरी ब्रूकने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याला सनरायझर्स हैदराबादने 13.50 कोटी रुपयांना विकत घेतले, पण त्याने किंमतीप्रमाणे कामगिरी केली नाही. हॅरी ब्रूकने आपल्या पहिल्या सत्रात हैदराबादकडून खेळताना 11 सामन्यात 21.11 च्या सरासरीने फक्त 190 धावा केल्या. या काळात त्याने निश्चितपणे 1 शतक झळकावले होते.

गेल्या वर्षी लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्सने ब्रूकला 4 कोटींची बोली लावून विकत घेतले तेव्हा या निर्णयात रिकी पॉन्टिंगची सर्वात मोठी भूमिका होती. ब्रूकला विकत घेतल्यानंतर पाँटिंग म्हणाला होता, “आम्ही आमच्या संघात आक्रमक शैलीचा इंग्लिश फलंदाज असल्याने खूप उत्सुक आहोत. तो सध्या जगातील सर्वात प्रतिभावान क्रिकेटपटूंपैकी एक आहे.”

Harry Brook Withdraws From IPL 2024 Latest Marathi News
Ranji Trophy Final : मुंबई-विदर्भातील सामना ड्रॉ झाला तर कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या काय सांगतो नियम

दिल्ली कॅपिटल्सचा संघ - ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, विक्की ओस्तवाल, कुमार कुशाग्र, सुमित कुमार, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, झाय रिचर्डसन, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, खलील अहमद, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, यश ढुल, स्वास्तिक छिकारा, रिकी भुई, रसिख डार, प्रवीण दुबे, मुकेश कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.