Harsha Bhogle Chennai Crowd IPL 2023 : आयपीएल 2023 च्या हंगामातील शेवटचे दोन सामने शिल्लक राहिले आहेत. नुकतेच प्ले ऑफमधील क्वालीफायर 1 आणि एलिमनेटरचा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर पार पडले. या दोन्ही सामन्यांना चेन्नईंच्या प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. क्वालीफायर 1 सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरातचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. चारवेळचे विजेते सीएसके आता अहमदाबादमध्ये पाचव्या विजेतेपदासाठी जोर लावतील.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सचने एलिमनेटर सामन्यात लखनौ सुपर जांयट्सचा 81 धावांवी पराभव करत क्वालीफायर 2 सामन्यात जागा मिळवली. आता ते अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सशी दोन हात करणार आहेत. दरम्यान, चेन्नईतील शेवटच्या सामन्यानंतर क्रीडा समिक्षक आणि समालोचक हर्षा भोगले यांनी चेन्नईच्या प्रेक्षकांना उद्येशून एक जबरदस्त ट्विट केले. सध्या हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.
हर्षा भोगले आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'चेन्नई आभारी आहे. खूप विनंम्र आणि स्वागतोत्सुक लोकांशी भेटलो. सध्याच्या काळात काही विशिष्ट लोकांकडून अत्यंत विषारी आणि अपमानजनक घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधा आणि खूप छान फरक दिसून आला.'
हर्षा भोगले यांचे हे ट्विट काही काळातच व्हायरल झाले. यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या. एलिमनेटर सामन्याबद्दल बोलायचं झालं तर उत्तराखंडच्या आकाश माधवालने दमदार गोलंदाजी करत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने अवघ्या 5 धावात 5 विकेट्स घेतल्या. लखनौचा 81 धावांनी पराभव करत मुंबईने आयपीएल फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
मुंबईने 20 षटकात 8 बाद 182 धावा केल्या होत्या. त्यानंतर मुंबईने आकाश माधवालच्या 3.3 षटकात 5 धावा 5 विकेट्स या ड्रीम स्पेलच्या जोरावर लखनौचा डाव 101 धावात संपवला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.