Mumbai Indians IPL 2024 : पाच पराभवानंतरही पांड्याची मुंबई करणार प्लेऑफ एट्री? फक्त करावे लागेल 'हे' काम

How Mumbai Indians Qualify For IPL 2024 Playoffs : मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
How Mumbai Indians Qualify For IPL 2024 Playoffs
How Mumbai Indians Qualify For IPL 2024 Playoffssakal
Updated on

How Mumbai Indians Qualify For IPL 2024 Playoffs : मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. आता मुंबई इंडियन्सचे 8 सामन्यांत 6 गुण झाले आहेत. आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे.

आठ सामन्यात पाच पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संघ प्लेऑफमध्ये कसा पोहोचेल? खरंतर, मागील हंगामातील प्लेऑफचे आकडे पाहिले तर मुंबई इंडियन्सला किमान 16 गुणांची आवश्यकता असेल. याशिवाय मुंबई इंडियन्सला आपला नेट रनरेट चांगला ठेवावा लागेल.

How Mumbai Indians Qualify For IPL 2024 Playoffs
IPL 2024 Playoffs Scenario : राजस्थानच्या विजयानंतर प्लेऑफच्या शर्यतीत उरल्या फक्त 6 टीम, 4 संघांच्या गाडीला लागला ब्रेक?

मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये कशी पोहोचेल?

आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सने आठ सामने खेळले असून त्यात फक्त तीन विजय मिळवता आले आहेत. हार्दिक पांड्याच्या संघाला 16 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढील 6 सामन्यांमध्ये 5 विजय नोंदवावे लागतील.

याशिवाय, त्यांना त्यांचा नेट रन रेट सुधारावा लागेल. मात्र, मुंबई इंडियन्सचे 16 गुण झाले तर त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. पण मुंबईसाठी प्लेऑफचा मार्ग सोपा नसला तरी या संघाने अनेकवेळा अशा परिस्थितीशी झुंज देत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. उदाहरणार्थ, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आशा असेल की हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफसाठी निश्चितपणे पात्र ठरेल.

How Mumbai Indians Qualify For IPL 2024 Playoffs
Sunil Narine : 'मी वर्ल्डकप खेळणार नाही...' IPL मध्ये तांडव घालणाऱ्या खेळाडूच्या पोस्टने क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

मुंबई इंडियन्सने हंगामाची सुरुवात गुजरात टायटन्सविरुद्ध केली होती. पण त्यांना गुजरात टायटन्सविरुद्ध 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर पुन्हा सनरायझर्स हैदराबादकडून 31 धावांनी पराभव झाला, त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 6 विकेटने त्यांना पराभवाची धूळ चारली.

आणि मुंबई इंडियन्सला पहिल्या 3 सामन्यात सलग पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, त्यानंतर मुंबई इंडियन्सने सलग सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि आसीबीचा पराभव केला. मात्र त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जविरुद्ध 9 धावांनी विजय मिळवला, पण त्यानंतर आठव्या सामन्यात हा संघ राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.