Team India T20 WC 24 : कर्णधार-उपकर्णधार फ्लॉप, टीम इंडिया चॅम्पियन कशी होणार?

T20 World Cup 2024 Rohit Sharma and Hardik Pandya : वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी कर्णधार आणि उपकर्णधार फॉर्मात नसतील तर संघ चॅम्पियन कसा होणार?
T20 World Cup 2024 Rohit Sharma and Hardik Pandya
T20 World Cup 2024 Rohit Sharma and Hardik Pandyasakal
Updated on

T20 World Cup 2024 Rohit Sharma and Hardik Pandya : बीसीसीआयने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आधीच टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियाची कमान पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हातात आहे तर हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून काम करताना दिसणार आहे. वर्ल्ड कप सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. पण आयपीएलचा हा हंगाम टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या या दोघांसाठी वाईट गेला आहे.

T20 World Cup 2024 Rohit Sharma and Hardik Pandya
KKR vs MI Score IPL 2024 : कोलकता प्लेऑफसाठी पात्र! हेलखावे खाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा आणखी एक पराभव

त्याच वेळी, त्यांच्या आयपीएल संघ मुंबई इंडियन्सची कामगिरी देखील या हंगामात सर्वात खराब राहिली. आणि मुंबई या हंगामात बाहेर पडणारा पहिला संघ बनला आहे. आता या दोन खेळाडूंच्या खराब फॉर्ममुळे वर्ल्ड कपपूर्वी चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी कर्णधार आणि उपकर्णधार फॉर्मात नसतील तर संघ चॅम्पियन कसा होणार?

T20 World Cup 2024 Rohit Sharma and Hardik Pandya
Indian Cricket : BCCI मोठ्या बदलाच्या तयारीत, 'या' स्पर्धेत नाही होणार आता नाणेफेक?

रोहित शर्माची आयपीएल 2024 मधील कामगिरी

रोहित शर्माने आयपीएल 2024 मध्ये चांगली सुरुवात केली. पण रोहित ज्या प्रकारे शेवटच्या 6 डावात फलंदाजी करत आहे ते वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी चांगले लक्षण नाही. या हंगामात आतापर्यंत रोहितने 13 सामन्यांत 349 धावा केल्या आहेत. या काळात रोहितनेही शतक झळकावले आहे. रोहितच्या शेवटच्या 6 डावांबद्दल बोलायचे झाले तर हिटमॅनच्या बॅटमधून केवळ 53 धावा आल्या आहेत. वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला नाही तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.

T20 World Cup 2024 Rohit Sharma and Hardik Pandya
Indian Cricket : BCCI मोठ्या बदलाच्या तयारीत, 'या' स्पर्धेत नाही होणार आता नाणेफेक?

हार्दिक पांड्याची आयपीएल 2024 मधील कामगिरी

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. मुंबई इंडियन्ससोबतच हार्दिकची कामगिरीही या हंगामात खूपच खराब राहिली. एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापत झाल्यानंतर हार्दिक क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता, या हंगामात पांड्याने पुनरागमन केले पण तो फॉर्ममध्ये नाही.

या हंगामात फलंदाजी करताना हार्दिकने 13 सामन्यांच्या 12 डावात केवळ 200 धावा केल्या आहेत. याशिवाय पांड्याच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर गोलंदाजीतही त्याला काही आश्चर्यकारक करता आले नाही. या हंगामात आतापर्यंत पांड्याला 11 विकेट्स घेता आल्या आहेत. गोलंदाजीतही पांड्या चांगलाच महागडा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.