IPL 2024 Pat Cummins : धावांचा पाठलाग करणे शिकावे लागेल ; सलग दोन पराभवानंतर हैदराबाद कर्णधार कमिंसची कबुली

प्रथम फलंदाजी करताना भले आम्ही तिनदा अडीचशे पार धावा केल्या असतील; परंतु धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा अभ्यास करावा लागेल, अशी कबुली हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिंसने दिली.
IPL 2024 Pat Cummins
IPL 2024 Pat Cumminssakal
Updated on

चेन्नई : प्रथम फलंदाजी करताना भले आम्ही तिनदा अडीचशे पार धावा केल्या असतील; परंतु धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा अभ्यास करावा लागेल, अशी कबुली हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिंसने दिली. या आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजीत बेधडक टोलेबाजी करून सर्वांना चकित करणाऱ्या हैदराबादला सलग दुसऱ्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात तर त्यांना दीडशे धावाही करता आल्या नाहीत.

चेन्नईत रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पडणारे दव यामुळे कमिंसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मैदानावर अधिक प्रमाणात दव पडलेले असूनही चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून हैदराबादच्या फलंदाजांना जखडून टाकले त्यांना पूर्ण २० षटकेही फलंदाजी करता आली नाही. १८.५ षटकांत त्यांचा डाव १३४ धावांत संपुष्टात आला.

आम्ही आखलेल्या रणनीतीनुसार काहीच घडले नाही. या मैदानावर धावांचा पाठलाग सोपा असेल, असा अंदाज होता; पण आम्ही त्यात अपयशी ठरलो. त्यामुळे आता आम्हाला धावांचा पाठलाग कसा करायचा याची वेगळी आखणी करावी लागणार आहे, असे सांगून कमिंस म्हणाला, इतर कोणत्याही मैदानापेक्षा येथे अधिक प्रमाणात दव पडले होते. अशा परिस्थितीतही आमचा डाव बाद करण्याची कामगिरी चेन्नईच्या गोलंदाजांनी केली. त्यामुळे तुच्याकडे अचूक आणि भेदक गोलंदाजी करण्याची क्षमता असेल तर दवासारख्या प्रतिकूल गोष्टी कमजोर ठरतात.

IPL 2024 Pat Cummins
IPL 2024, LSG vs MI: मुंबई इंडियन्स वाढदिवशी रोहितला विजयाची भेट देणार? लखनौविरुद्ध रंगणार महत्त्वाचा सामना

या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा स्वतःचाच विक्रम मोडण्याचा पराक्रम करणाऱ्या हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार हे जवळपास निश्चित असल्याची शक्यता आहे; परंतु आत्तापर्यंत त्यांनी एकूण चार सामने गमावले आहेत. गेल्याच आठवड्यात बंगळूर संघाविरुद्धही ते २०७ धावांचा पाठलाग करू शकले नव्हते.

आमचे सलामीवीर अपयशी ठरल्यानंतर पुढचे फलंदाज त्यांच्याच मार्गावरून गेले आहेत. दिल्लीच्या मैदानात आम्ही विक्रमी धावसंख्या उभारली होती; पण गेल्या दोन सामन्यांत धावांचा पाठलाग करताना मधल्या फळीनेही निराशा केली. यातून आता मार्ग काढवाच लागणार आहे, असे कमिंस म्हणाला.

रविवारच्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली यात शंकाच नाही; परंतु आमच्या फलंदाजांनी बेजबाबदार फटके मारून विकेट गमावल्या हेसुद्धा तेवढेच सत्य आहे. अशा धावांचा पाठलाग करताना हुशारी दाखवावी लागते, असेही कमिंस म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.