IND vs PAK WC 2023 Schedule: महामुकाबल्याची तारीख ठरली! या दिवशी रंगणार भारत-पाकचा थरार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना कधी खेळला जाणार आहे त्यावर मोठी अपडेट
IND vs PAK WC 2023 Schedule
IND vs PAK WC 2023 Schedule
Updated on

India vs Pakistan ICC ODI World Cup 2023 Schedule : एकदिवसीय विश्वचषक 2023 यावर्षी भारतात खेळल्या जाणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू झाली असून ती आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना कधी खेळला जाणार आहे त्यावर मोठी अपडेट समोर आली आहे.

आयसीसीने अद्याप पूर्ण वेळापत्रक जाहीर केले नसले तरी त्याचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. विश्वचषकाचा पहिला सामना केव्हा आणि कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाणार हे देखील समोर आले आहे.

IND vs PAK WC 2023 Schedule
IPL 2023 Playoff Scenario : एका सामन्यामुळे 5 संघांना बसला मोठा धक्का! जाणून घ्या प्लेऑफचे समीकरण

आयसीसी विश्वचषक 2023 चा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळला जाऊ शकतो. या दिवशी इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येऊ शकतात. वर्ष 2019 मध्ये जेव्हा एकदिवसीय विश्वचषक झाला तेव्हा या दोन संघांमध्ये अंतिम फेरीत विजेतेपदाची लढत झाली. म्हणजेच गेल्या विश्वचषकाचा शेवट जिथे झाला, तिथून नवा सुरू होईल.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला फायनल खेळली जाऊ शकते, अशी बातमी आहे. म्हणजेच या दिवशी आपल्याला एकदिवसीय विश्वचषकाचा नवा चॅम्पियन मिळेल. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असून हा सामना चेन्नईत खेळल्या जाण्याची शक्यता आहे.

IND vs PAK WC 2023 Schedule
CSK vs DC : चेन्नईच्या Playing-11मध्ये होणार मोठा बदल? दुखापतीनंतर परतणार अष्टपैलू खेळाडू

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना रविवारी खेळल्या जाईल. असे सांगितले जात आहे की आयसीसीने संपूर्ण वेळापत्रक तयार केले आहे आणि आयपीएल 2023 संपल्यानंतर कोणत्याही दिवशी त्याची घोषणा केली जाऊ शकते.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा सामना खेळला जाऊ शकतो. यावेळच्या विश्वचषकात एकूण दहा संघ खेळताना दिसतील, त्यापैकी आठ संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे, उर्वरित दोन संघ पात्रता फेरी खेळल्यानंतर मैदानात उतरतील. म्हणजेच प्रत्येक संघाला किमान 9 सामने खेळावे लागणार आहेत.

यावेळी विश्वचषकात एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश क्षिण आफ्रिकेने चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.