आयपीएल संपल्यानंतर भारताला 9 ते 19 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. IPL 2022 चा लीग सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने BCCI कडे ब्रेकची मागणी केली आहे. दक्षिण आफ्रिका, आयर्लंड मालिका आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवडण्यासाठी बीसीसीआय निवड समिती आज बैठक घेणार आहे.(indian captain rohit sharma bcci for short break from ind vs sa series)
निवडकर्त्यांना दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघातील काही वरिष्ठ खेळाडूंची निवड करायची होती तेव्हा रोहित शर्माने ब्रेकची मागणी केली आहे. त्यामागील कारण म्हणजे भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले मजबूत बाजू पाठवायची आहे. मात्र रोहित शर्मा काही फॉर्म आलेला दिसत नाही. त्यामुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्व सामने खेळले पण विशेषत कामगिरी करत आली नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी रोहितला माइंड फ्रेश करायची इच्छा आहे.
आयपीएल मध्ये रोहित शर्माची कामगिरी निराशाजनक होती कारण त्याने 19.14 च्या सरासरीने केवळ 268 धावा केल्या. रोहितला एकही अर्धशतक करता आलेले नाही. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहितचा संघर्ष दिसत होता. रोहित शर्माला खाते उघडण्यासाठी 10 चेंडूंचा सामना करायला लागला. शेवटी 13व्या चेंडूवर एनरिक नॉर्टजेने त्याला बाद केले. आयपीएलच्या मागील 22 डावांमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. तो 14 डावांपैकी 5 वेळा सिंगल डिजिटवर म्हणजेच 10 पेक्षा कमी धावांवर बाद झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.