Ind vs Aus Hockey : भारतीय हॉकी संघाची दहा वर्षांची प्रतीक्षा संपणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजपासून मालिका.... जाणून घ्या शेड्यूल

भारताचा पुरुष हॉकी संघ आजपासून बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. २०१४ नंतर भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलियात हॉकी मालिका विजय मिळवता आलेला नाही.
Ind vs Aus Hockey
Ind vs Aus Hockey News sakal
Updated on

भारताचा पुरुष हॉकी संघ आजपासून बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. २०१४ नंतर भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलियात हॉकी मालिका विजय मिळवता आलेला नाही. यंदा तरी दहा वर्षांची प्रतीक्षा संपणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी दोन देशांमधील पाच सामन्यांची मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

Ind vs Aus Hockey
IPL 2024 RCB VS RR : संजू सॅमसनची सेना मारला विजयाचा 'चौकार' की बंगळूरु रोखणार राजस्थानचा विजयरथ?

भारतीय संघ क्रमवारीत चौथ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियन संघ पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन देशांमध्ये रोमहर्षक लढत हॉकीप्रेमींना पाहायला मिळणार हे निश्‍चित आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या प्रो हॉकी लीगमधील लढतींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.

भुवनेश्‍वरमध्ये झालेल्या चारपैकी तीन लढतींमध्ये त्यांनी विजय मिळवला. तसेच रौरकेला येथे झालेल्या लढतींमध्ये भारतीय संघ पराभूत झालेला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही लढतींमध्ये त्यांना हार पत्करावी लागली. त्यामुळे भारतासाठी पाच सामन्यांची मालिका खडतर असणार आहे.

Ind vs Aus Hockey
SRH vs CSK : डोकेबाज गोलंदाज आहे कर्णधार! हैदराबादनं मुंबईनंतर आता चेन्नईचा देखील माज उतरवला

कांगारूंचे वर्चस्व

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २०१३ पासून ४३ सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने २८ सामन्यांमध्ये विजय मिळवले असून भारतीय संघाला फक्त आठ सामन्यांमध्ये विजय मिळवता आले आहेत. दोन देशांमधील सात सामने ड्रॉ राहिले आहेत. मागील अकरा वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकता कांगारू अर्थातच ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून येत आहे.

Ind vs Aus Hockey
SRH vs CSK IPL 2024 : माक्ररमचे अर्धशतक तर अभिषेकचा तडाखा; हैदराबादचा चेन्नईवर सहज विजय

भारत-ऑस्ट्रेलिया हॉकी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना - ६ एप्रिल (दुपारी २ वाजता)

  • दुसरा सामना - ७ एप्रिल (दुपारी २ वाजता)

  • तिसरा सामना - १० एप्रिल (दुपारी ३ वाजता)

  • चौथा सामना - १२ एप्रिल (दुपारी ३ वाजता)

  • पाचवा सामना - १३ एप्रिल (दुपारी २ वाजता)

''आमचा सराव छान झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कडवे आव्हान असले तरी आम्ही सज्ज आहोत. या मालिकेत विजयासाठीच मैदानात उतरणार आहोत, पण पॅरिस ऑलिंपिकसाठीही पाया मजबूत करायचा आहे.''

- हरमनप्रीत सिंग, कर्णधार, भारतीय हॉकी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.