R Ashwin: 'कधीकधी आश्चर्य वाटतं की IPL क्रिकेटही आहे का?', अश्विनचं खळबळजनक भाष्य

R Ashwin on IPL: आर अश्विनने आयपीएलबाबत बोलताना कधीकधी खेळ मागे पडत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
R Ashwin | IPL
R Ashwin | IPLSakal
Updated on

R Ashwin on IPL: भारताचा स्टार फिरकीपटू सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. दरम्यान, 37 वर्षीय अश्विनने नुकतेच आयपीएलबाबत मोठे भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की कधीकधी आयपीएल क्रिकेट आहे, याचे आश्चर्य वाटते. आयपीएलने गेल्या 17 वर्षात केलेला विकास पाहून अश्विनने हे भाष्य केले आहे.

अश्विनने आयपीएलदरम्यान खेळाडूंना सराव आणि जाहिरांतीचे शूट यादरम्यान त्यांचा वेळ मॅनेज करण्याचे आव्हान पेलावे लागते असेलही सांगितले आहे. तो इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट होस्ट करत असलेल्या क्लब प्रेरिए फायर पॉडकास्टमध्ये बोलत होता.

अश्विन म्हणाला, 'युवा खेळाडू म्हणून जेव्हा मी आयपीएलमध्ये आलो होतो, तेव्हा मी फक्त दिग्गज खेळाडूंकडून शिकण्याचा विचार करत होतो. मी हा विचार नव्हता केला की १० वर्षांनंतर आयपीएल कसे असेल. आता इतके आयपीएल हंगाम खेळल्यानंतर मी असं म्हणू शकतो की आयपीएल खूप मोठे आहे.'

'कधीकधी मला आश्चर्य वाटते की आयपीएल हे क्रिकेटही आहे का, कारण बऱ्याचदा आयपीएलवेळी खेळ मागे पडतो, इतके हे मोठे आहे. आम्ही कधीकधी जाहिरातींच्या शुटमध्ये आणि सेट्सवर सराव करतो, इथपर्यंत आयपीएल पोहोचले आहे.'

आयपीएलने आता मीडिया हक्काबाबतही इंग्लिश प्रीमियर लीग, एनबीए, मेजर लीग बेसबॉल अशा मोठ्या स्पर्धांना मागे टाकले आहे.

R Ashwin | IPL
IPL 2024 : RR विरुद्धच्या पराभवानंतर ऋषभ पंतचा संयम सुटला! रागाच्या भरात भिंतीवर... Viral Video

दरम्यान, अश्विनने आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणीही सांगितल्या आहेत. अश्विनने 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

अश्विन म्हणाला, 'आयपीएलचा एवढा विकास होईल, असा विचार कोणीही केला नव्हता. मला अजूनही स्कॉट स्टायरीसबरोबर झालेली चर्चा आठवते. तेव्हा आम्ही दोघेही सीएसके संघात होतो.'

'त्याने मला म्हटले होते की तो जेव्हा पहिल्या हंगामात आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळलेला, तेव्हा त्याने विचार नव्हता केला की आयपीएल 2-3 वर्षापेक्षा अधिककाळ टिकेल. सुरुवातीला पैशाची मोठी आवाक होती.'

R Ashwin | IPL
Riyan Parag: 'सामन्यापूर्वी तीन दिवस बेडवर पेन किलर्स खात...', RR च्या विजयाचा हिरो रियान परागचा मोठा खुलासा

अश्विन पुढे म्हणाला, 'अनेकवर्षांपासून तुम्ही पाहिले तर आयपीएल एक अशी स्पर्धा आहे, जी सर्वात आधी लिलावातही जिंकली जाते. मला वाटते लिलाव या स्पर्धेचा खूप महत्त्वाचा भाग आहे, पण आयपीएलची खरी मजा यात आहे की फ्रेँचायझी त्यांच्या संघाची योग्य संघबांधणी कशी करतात.'

'एकच पद्धत लागू होत नाही. कोणताही खेळाडू संघापेक्षा मोठा नसतो. कोणतीही जागा कोणापेक्षा मोठी नसते. संघाला हुशारीने विचारपूर्वक गुंतवणूक करावी लागते.'

अश्विन जवळपास 16 वर्षांपासून आयपीएल खेळत असून त्याने चेन्नई सुपर किंग्सनंतर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()