आयपीएल 2022 च्या नवव्या सामन्यात यंदाच्या हंगामातील पहिले शतक पाहायला मिळाले. राजस्थान रॉयल्सकडून बटरलने शतकी खेळी केली. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या या सामन्यात राजस्थानच्या युजवेंद्र चहलने आपल्या फिरकीनं फलंदाजांना नाचवले. तिलक वर्मा आणि इशान किशन दमदार फलंदाजी करत असताना चहरने अनुभवाच्या जोरावर गोलंदाजीचा उत्तम नमुना पेश केला. या सामन्यात चाहत्यांना शतकासोबतच हॅटट्रिकही बघायला मिळाली असती पण चहलची हॅटट्रिक थोडक्यात हुकली.
मुंबईच्या डावातील 16 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर चहलनं टिम डेविडला पायचित केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर डॅनियल सॅम्सला त्याने आल्यापावली माघारी धाडले. बटरलने त्याचा झेल टिपला. या दोन विकेट्सनंतर मुरगन अश्विनने हॅटट्रिक बॉल खेळला. चहलनं त्यालाही अप्रतिम चेंडू टाकला. बॅटची कड घेऊन चेंडू स्लीपच्या फिल्डरच्या दिशेन गेला. करुन नायरने डाइव्ह मारत कॅच घेण्याचाही प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. त्याच्यासोबत चहलची हॅटट्रिकची संधी हुकली. सहज आणि सोपा झेल सोडून आपल्याच माणसाने चहलची हॅटट्रिक हुकवली.
नायरनं कॅच सोडला त्यावेळी चहलची चेहऱ्यावरची हावभाव बघण्यासारखी होती. क्षणभर त्याला कॅच सुटलाय यावर विश्वासच बसत नव्हता. हॅटट्रिक कोणत्याही गोलंदाजासाठी खूप मोठी गोष्ट असते. ती संधी हुकल्यानंतरही चहलच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसले. आपल्या सहकाऱ्यावर राग न व्यक्त करता त्याने पुन्हा गोलंदाजीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात चहलनं 26 धावा खर्च करुन दोन विकेट घेतल्या. पहिल्या सामन्यापासून चहल दमदार गोलंदाजी करताना दिसत आहे.
सलामीवीर जोस बटलरच्या 68 चेंडूतील दमदार शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 193 धावा कुटल्या होत्या. या धावा करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी फिरला. त्यानंतर इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतके झळकावली. पण मुंबई इंडियन्सला 23 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.