दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने दिल्लीच्या मैदानात केलेल्या पराभवाची परतफेड केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित 20 षटकात 8 बाद 136 धावांपर्यंत मजल मारु शकला. सौरभ तिवारीच्या नाबाद 50 धावा वगळता अन्य कोणत्याही मुंबईकराला फलंदाजीत तग धरता आला नाही. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. दीपक चाहरला 2 तर जोश हेजलवूड आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माशिवायच मैदानात उतरला होता. धोनीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचा गोलंदाजांनी भेदक मारा करत धोनीचा निर्णय व्यर्थ ठरवला. पण आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर सलामीवीर ऋतूराज गायकवाडने संघाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने 58 चेंडूत केलेल्या नाबाद 88 धावांची खेळीमुळे चेन्नईच्या संघाला निर्धारित 20 षटकात 6 बाद 156 धावांपर्यंत मजल मारता आली. ऋतूराजने जाडेजासोबत पाचव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. जड्डू माघारी फिरल्यानंतर ब्रावोनेही त्याला सुरेख साथ दिली. हे चित्र मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पाहायला मिळाले नाही.
ऋतूराजप्रमाणेच सौरभ तिवारीनं मैदानात तग धरला. पण दुसऱ्या बाजून त्याला एकानेही साथ दिली नाही. परिणामी मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील विजयासह चेन्नई सुपर किंग्जने 8 पैकी 6 सामन्यात जिंकतत 12 गुणासह गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले आहे. स्पर्धाल सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा संघ टॉपला होता. पण मुंबई आणि चेन्नई यांच्यातील लढतीनंतर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. मुंबई इंडियन्स 8 पैकी 4 विजय आणि 4 पराभवासह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम राहिलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.