Video: खतरनाक स्पिन! धोनीचा वरूण चक्रवर्तीने उडवला त्रिफळा

Video: खतरनाक स्पिन! धोनीचा वरूण चक्रवर्तीने उडवला त्रिफळा
Updated on
Summary

धोनीला चेंडू कळेपर्यंत तो झाला होता 'क्लीन बोल्ड'

IPL 2021 CSK vs KKR: कोलकाताविरूद्धच्या अटीतटीच्या लढतीत चेन्नईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. महत्त्वाचे खेळाडू बाद झाल्यावर मोक्याच्या क्षणी रविंद्र जाडेजाने तुफान फटकेबाजी करत संघाला विजयासमीप नेले होते, तर शेवटच्या चेंडूवर आवश्यक १ धाव काढून दीपक चहरने संघाला विजय मिळवून दिले. या सामन्यात CSK जिंकली असली तरी चर्चा मात्र झाली KKRच्या वरूण चक्रवर्तीची...

Video: खतरनाक स्पिन! धोनीचा वरूण चक्रवर्तीने उडवला त्रिफळा
Video: दिनेश कार्तिकला सूर गवसला; चौकार-षटकाराची आतषबाजी

वरूण चक्रवर्ती आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील द्वंद्व हे पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. युएईमध्ये आतापर्यंत तीन वेळा वरूणच्या समोर धोनी फलंदाजीसाठी आला आहे. आणि तीनही वेळा वरूणनेच धोनीचा काटा काढला. आजच्या सामन्यात धोनी जेव्हा खेळायला आला तेव्हा संघाला भरपूर धावा हव्या होत्या. अशा वेळी धोनीला मोठे फटके खेळण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्याने एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याला चेंडू समजलाच नाही. चेंडू पटकन आत वळला आणि गुगली गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला.

Video: खतरनाक स्पिन! धोनीचा वरूण चक्रवर्तीने उडवला त्रिफळा
IPL Record : मिलरची शिकार करत अश्विनने रचला खास विक्रम

दरम्यान, महेंद्रसिंग धोनी त्रिफळाचीत झाल्याने एका अर्थी चेन्नईचा फायदाच झाला. धोनीच्या नंतर रविंद्र जाडेजा मैदानात आला. त्याने प्रसिद्ध कृष्णाच्या एका षटकात सामना फिरवला. त्याने कृष्णाच्या गोलंदाजीवर १९ धावा काढल्या. तेथेच खऱ्या अर्थाने कोलकाताच्या हातून सामना निसटला. त्यानंतर शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ रंगला खरा, पण अखेर शेवटच्या चेंडूवर एक धाव काढत चेन्नईने विजय मिळवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.