IPL 2021, CSK vs MI : पॉलार्ड टॉसवेळी म्हणाला; रोहित ठिकये! पण...

टॉसनंतर पोलार्ड नक्की काय बोलणार याकडे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे लक्ष होते.
Rohit Sharma
Rohit Sharma
Updated on

IPL 2021 CSK vs MI Rohit Sharma : आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला युएईच्या मैदानातून सुरुवात झालीये. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील टॉसवेळी मुंबईकरांना मोठा धक्का बसला. नियमित कर्णधार रोहित शर्मा ऐवजी नाणेफेकीसाठी केरॉन पोलार्ड मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी पोलार्ड नक्की काय बोलणार याकडे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे लक्ष होते. रोहित ठिक आहे. मी आजच्या सामन्यापूरतेच संघाचे नेतृत्व करणार असून पुढील सामन्यात तोच टॉसला आल्याचे पाहायला मिळेल, असा विश्वास पोलार्डने व्यक्त केला आहे.

Rohit Sharma
ये बाबा IPL कोण खेळणार? म्हणे पाकिस्तानला जातोय!

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रोहित शर्माशिवाय हार्दिक पांड्यालाही स्थान मिळालेले नाही. अनमोलप्रित सिंग आणि सौरव तिवारी यांना संधी देण्यात आली आहे. क्विंटन डिकॉकसह डावाला सुरुवात करण्याची जबाबदारी ही ईशान किशनच्या खांद्यावर असेल.

मुंबई इंडियन्सचा संघ :

क्विंटन डि कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अनमोलप्रित सिंग, केरॉन पोलार्ड (कर्णधार), सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, एडम मिल्ने, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ :

फाफ ड्युप्लेसीस, ऋतूराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार), रविंद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवूड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.