IPL 2021 : 400 सिक्सरचा विक्रम हिटमॅनच्या टप्प्यात !

चेन्नई विरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माला एक खास विक्रम खुणावत आहे.
Rohit Sharma
Rohit Sharma
Updated on

IPL 2021 CSK vs MI Rohit Sharma : युएईच्या मैदानात पुन्हा एकदा आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल. चेन्नई विरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माला एक खास विक्रम खुणावत आहे.

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 30 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुबईच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. हिटमॅन रोहित शर्माने आतापर्यंत टी-20 मध्ये 397 षटकार मारले आहेत. जर चेन्नई विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 3 षटकार खेचले तर तो या सामन्यात 400 षटकारांचा पल्ला गाठेल. टी-20 मध्ये 400 षटकारांचा पल्ला गाठणारा भारताचा तो पहिला फलंदाज ठरेल. यापूर्वीच त्याने विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांना मागे टाकले आहे.

Rohit Sharma
MI Vs CSK Fantasy Dream11: कोणते खेळाडू ठरतील फायद्याचे?

टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून केवळ 4 फलंदाजांनी 300 + षटकार खेचले आहेत. यात रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ सुरेश रैनाचा नंबर लागतो. रैनाने 331 टी20 सामन्यात 324 षटकार मारले आहेत. कोहलीने 311 टी20 सामन्यात 315 तर धोनीने 338 टी 20 सामन्यात 303 षटकार मारले आहेत.

Rohit Sharma
IPL 2021 : लेकरांसह स्टेडियममध्ये नो एन्ट्री!

टी 20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम गेलच्या नावे

रोहितने चेन्नई विरुद्ध 3 षटकार मारले तर तो 400 चा पल्ला गाठणारा सातवा फलंदाज ठरेल. टी20 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या गेलच्या नावे आहे. त्याने 446 टी 20 सामन्यात 1042 षटकार लगावले आहेत. कायरेन पोलार्डने 561 टी 20 सामन्यात 755 तर आंद्रे रसेलनं 379 टी-20 सामन्यात 509 >षटकार खेचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.