IPL 2021 KKR vs PBKS: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुल याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व्यंकटेश अय्यरच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर कोलकाताने जबरदस्त सुरुवात केली. पण अखेरच्या षटकात कोलकाताच्या मध्यफळीतील फलंदाजांना मोठी फटकेबाजी करण्यात अपयश आले. परिणामी पंजाबचा संघ निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
अखेरच्या षटकात पंजाबच्या अर्शदीप सिंगने पुन्हा एकदा कमालीच्या गोलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने आपल्या संघाकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. यात सलामीवीर शुभमन गिल 7(7), नितीश राणा 31 (18) आणि कोलकाताच्या डावातील अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर दिनेश कार्तिकची विकेट घेतली. कार्तिक उलटा सुलटा फटका मारताना क्लिन बोल्ड झाला. नितीश राणाने अर्शदीपच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केल्यानंतर सुपर कमबॅक करत अर्शदीपने त्याला तंबूत धाडले.
पंजाबच्या संघाला विकेट मिळाल्यानंतर मैदानात खेळाडूंमध्ये उत्साह दिसत होतो. दुसरीकडे असाच काहीसा माहोल व्हिआयपी स्टँडमध्ये मॅच पाहण्यासाठी उपस्थितीत असलेल्या प्रिती झिंटाच्या चेहऱ्यावरही आनंद ओसांडून वाहताना दिसला. गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर प्रिती झिंटा स्टँडमध्ये आनंद व्यक्त करत आपल्या संघाला प्रोत्साहित करताना दिसली.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात अर्शदीपशिवाय रवि बिश्नोईला दोन तर मोहम्मद शमीला एक विकेट मिळाली. या सामन्यापूर्वी कोलकाताचा संघ चौथ्या स्थानावर असला तरीही त्यांना 11 पैकी केवळ पाच सामन्यांमध्येच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे हा सामना त्यांच्यासठी खूप महत्त्वाचा आहे. दुसरीकडे पंजाब संघाने 11 सामन्यात 4 विजय मिळवले असून ते सहाव्या स्थानी आहेत. त्यांनाही पुढील तीन सामने जिंकणे अनिवार्य आहे. ते पराभूत झाल्यास त्यांचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची भीती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.