IPL 2021 KKR vs RCB 31st Match : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 10 ओव्हर आणि 9 गडी राखून पराभूत करत कोलकाता नाईट रायडर्सने आजची रात्र गाजवली. अबूधाबीच्या मैदानात (Sheikh Zayed Stadium) रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली. दिग्गजांनी बहरलेला संघ 19 षटकात अवघ्या 92 धांवात आटोपला होता. त्यांनी ठेवलेल्या अल्प दावसंख्येच लक्ष्य कोलकाता संघाने सहज पार केले. Match updates in Marathi)
सलामीवीर शुभमन गिलने 34 चेंडूत 48 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने 6 चौकार आणि 1 उत्तुंग षटकार खेचला. चहलने त्याला बाद केले. तो माघारी फिरल्यानंतर आयपीएलमधील पहिला सामना खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. व्यंकटेश अय्यरने 27 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 41 धावांची खेळी केली. त्याच्या रुपात कोलकाता नाईट रायडर्सला आता एक नवा आणि भरवशाचा सलामीवीर मिळाला आहे.
पहिल्यांदा बॅटिंग करताना बंगळुरुची सुरुवात खराब झाली. देवदत्त पडिक्कल 22, एस भरत 16, मॅक्सवेल 10 आणि हर्षल पटेलच्या 12 धावा वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 3-3 तर लॉकी फर्ग्युसन 2 आणि प्रसिद्ध कृष्णाने विराट कोहलीच्या रुपात एक विकेट घेतली. (RCB vs KKR
शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली.
82-1 : चहरने कोलकाताची सलामी जोडी फोडली, त्याने शुभमन गिलला बाद केले.
पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या बंगळुरुच्या संघातील स्टार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेल यांना नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. परिणामी संघाचा डाव 1 षटक बाकी असताना 92 धावांतच आटोपला
92-10 : मोहम्मद सिराजला बाद करत रसेलनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळ खल्लास केला.
83-9 : लॉकी फर्ग्युसनने हर्षल पेलटला 12 धावांवर तंबूत धाडले
76-8 : बॉलिंगमध्ये कमाल दाखवणाऱ्या चक्रवर्तीची फिल्डिंगमध्येही कमाल, कायले जेमिनसनला केलं रन आउट
66-7 : वरुण चक्रवर्तीच्या खात्यात आणखी एक विकेट, सचिन बेबी 7 धावांवर माघारी
63-6 : मॅक्सवेलची जागा घेण्यासाठी आलेल्या हसरंगाला वरुणने खातेही उघडू दिले नाही
63-5 : वरुण चक्रवर्तीनं घेतली ग्लेन मॅक्सवेलची फिरकी, अवघ्या 10 धावांव धाडले तंबूत
52-4 : मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सला रसेलनं खातेही उघडू दिले नाही, रसेलचे सामन्यातील दुसरे यश
51-3 : आंद्रे रसेलनं केएस भरतला 19 (19) दाखवला तंबूचा रस्ता, बंगळुरुला तिसार धक्का
अर्धशतकाच्या आतच बंगळुरुला दुसरा धक्का!
41-2 : देवदत्त पदिक्कलही 22 धावा करुन माघारी, लॉकी फर्ग्युसनला मिळाले यश
प्रसिद्ध कृष्णाला मिळाली 'विराट' विकेट
10-1 : कोहली 8 धावांवर पायचित झाला, प्रसिद्ध कृष्णाने घेतली विकेट
कोलकाता संघ
शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), आंद्र रसेल, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), सुनील नरेन, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा.
बंगळुरु संघ
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पदिक्कल, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), एबी डिव्हिलियर्स, वानिडु हंसरंगा, सचिन बेबी, कायले जेमिन्सन, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल.
कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.