IPL 2021 MI vs KKR: गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडे एकाहून एक स्टार गोलंदाज असूनही कोलकाताच्या फलंदाजांनी त्यांना धूळ चारली. कोलकाताच्या युवा फलंदाजांनी मुंबईच्या अनुभवी गोलंदाजांना चांगलाच चोप दिला आणि ७ गडी राखून सामना खिशात घातला. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांच्या खेळीमुळे मुंबईला वादळी सुरूवात मिळाली होती. पण सुनील नारायणने रोहितला बाद केले. रोहित बाद झाल्यावर डी कॉक कोणाचीच साथ मिळाली नाही. त्यामुळे एका टप्प्यावर १७० पार मजल मारण्याची क्षमता असलेल्या मुंबईच्या संघाला केवळ १५५ धावाच करता आल्या.
१५५ धावा हेदेखील आव्हानात्मक लक्ष्य होतं. पण कोलकाताच्या फलंदाजांनी या आव्हानाचा खरपूस समाचार घेतला. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टला शुबमन गिलने १ आणि व्यंकटेश अय्यरने १ असे दोन षटकार लगावले. सुदैवाने गिल स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर, व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. सलामीवीर व्यंकटेश अय्यरने ३० चेंडूत ५३ धावांची खेळी केली. त्याने IPLमधील पहिले अर्धशतक साजरे केले. त्याला साथ देणाऱ्या राहुल त्रिपाठीने सामना संपेपर्यंत पिचवर तग धरला. त्याने ४२ चेंडूत नाबाद ७४ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. सुनील नारायणला सामनावीराचा किताब देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.