IPL 2021 MI vs KKR: स्पर्धेत गुरूवारी मुंबई विरूद्ध कोलकाता असा सामना रंगला. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा टॉससाठी मैदानात आला. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला. गेल्या सामन्यात काही कारणास्तव कायरन पोलार्डकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले होते आणि रोहित संघाबाहेर होता. पण या सामन्यात त्याच्या पुनरागमनाने सारेच खुश झाले. रोहितने टॉसच्या वेळी संघातील बदल सांगितले. त्यावेळी केवळ त्याच्या जागी अनमोलप्रीतला संघाबाहेर ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालं. पण हार्दिक पांड्याला मात्र अद्यापही संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे नेटकऱ्यांची सोशल मिजियावर हार्दिकबद्दल जोरदार चर्चा रंगली.
पाहूया त्या संबंधीचे काही ट्वीट्स...
दरम्यान, पहिल्या सामन्यातही हार्दिक पांड्या संघाबाहेर होता. त्यावेळी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी हार्दिकबद्दल महत्त्वाची माहिती दिली होती. "हार्दिक पांड्या हा गेले अनेक दिवस सामने खेळलेला नाही. हार्दिकने श्रीलंकेविरूद्ध टी२० मालिका खेळली होती. त्यानंतर हार्दिकने मुंबई इंडियन्सच्या कँपमध्ये सरावाला सुरूवात केली होती. पण सराव करताना त्याच्या पायाच्या दुखापतीने थोडीशी उचल खाल्ली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही त्याला एका सामन्याची विश्रांती दिली. तो लवकरच पूर्णपणे तंदुरूस्त होईल. त्याची दुखापत फारशी गंभीर नाही", अशी माहिती जयवर्धने यांनी दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.