IPL 2021 : मुंबईच्या पठ्ठ्यांकडून हिटमॅनचं जंगी स्वागत (VIDEO)

संघातील खेळाडूंनी त्याचे जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.
Rohit Sharma
Rohit Sharma
Updated on

IPL 2021 : आयपीएल (IPL) च्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. इंग्लंड दौऱ्यावरुन परतल्यानंतर तो क्वारंटाईन होता. 6 दिवसांचे अनिवार्य क्वांरटाईन पूर्ण करुन तो संघाला जॉईन झाला. संघातील खेळाडूंनी त्याचे जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा मँचेस्टर कसोटी सामना रद्द झाल्यानंतर लगेच रोहित शर्मा युएईला रवाना झाला होता. सूर्यकुमार यादव आणि बुमराह हे दोघेही त्याच्याचसोबत युएईला पोहचले होते. कोरोनाच्या नियमावलीनुसार, युएईमधून आल्यानंतर ते क्वारंटाईन होते.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा संघात सामील झाल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंवरुन शेअर केला आहे. यात मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने, झहीर खान, हार्दिक पांड्या, धवल कुलकर्णी आणि ट्रेंट बोल्ट या खेळाडू उत्साहात रोहित शर्माचे स्वागत करताना पाहायला मिळते.

Rohit Sharma
IPL 2021 Purple Cap च्या शर्यतीत आघाडीवर असलेले 5 गोलंदाज

आयपीएलच्या इतिहासात विक्रमी पाचवेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामातील पहिल्या टप्प्यात संघर्ष करत असताना दिसले. मुंबई इंडियन्सचा संघ लयीत येत असताना स्पर्धा स्थगित झाली होती. आतापर्यंत झालेल्या 7 सामन्यात मुंबई इंडियन्सने 4 विजयासह 8 गुण मिळवले असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. शेवटचे दोन्ही सामने त्यांनी जिंकले होते.

Rohit Sharma
IPL 2021: 'मुंबई इंडियन्स'ची पहिल्या टप्प्यात काय केलं? वाचा..

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी ही सर्वोत्तम राहिली आहे. सर्वाधिक पाचवेळा संघाने जेतेपद पटकावले आहे. आयपीएलमध्ये संघाला सर्वाधिक जेतेपद मिळवून देण्याचा खास विक्रम रोहित शर्माच्या नावे आहे. त्याच्या या कामगिरीमुळेच भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपदही रोहितकडे येणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()