IPL 2021 CSK vs SRH: ऋतुराज गायकवाड (४५) आणि फाफ डु प्लेसिस (४१) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने दिमाखात प्ले-ऑफ्स फेरीत प्रवेश केला. अनुभवी वृद्धिमान साहाने ४४ धावा करत हैदराबादला १३४ धावांपर्यंत पोहोचवलं होतं. हे आव्हान CSKने २ चेंडू आणि ६ गडी राखून पार केलं. या विजयामुळे धोनीचा संघ यंदाच्या हंगामात प्ले ऑफ्सचं तिकीट मिळवणारा पहिला संघ ठरला. तर हैदराबाद हा स्पर्धेतून बाहेर जाणारा पहिला संघ ठरला. पाहा या सामन्यानंतरचे Points Table-
CSK vs SRH सामन्यानंतर IPL 2021 Points Table
असा रंगला सामना...
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम हैदराबादला फलंदाजीसाठी बोलावलं. धोनीचा गोलंदाजीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. संथ पिचवर साजेशी गोलंदाजी करत खेळाडूंनी हैदराबादला रोखून ठेवलं. सलामीवीर वृद्धिमान साहाने ४४ धावा केल्या. त्या व्यतिरिक्त, जेसन रॉय (२), केन विल्यमसन (११), प्रियम गर्ग (७), अभिषेक शर्मा (१८), अब्दुल समद (१८) आणि जेसन होल्डर (५) या फलंदाजांनी साफ निराशा केली. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (४५) आणि फाफ डु प्लेसिस (४१) यांनी शतकी सलामी दिली. त्यानंतर मोईन अली (१७), सुरेश रैना (२) झटपट बाद झाले. पण, मोक्याच्या क्षणी धोनीने उत्तुंग षटकार मारला आणि संघासाठी विजयश्री खेचून आणली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.