Indian Premier League 2021 Points Table : आयपीएलच्या 14 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी आपले स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. उर्वरित दोन जागेसाठी तगडी फाईट पाहायला मिळते. पण यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु तिसऱ्या क्रमांकावर असून उर्वरित दोन जागेपैकी एका जागेचे ते प्रबळ दावेदार आहेत. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने 11 सामन्यातील 9 विजय आणि 2 पराभवासह 18 गुण मिळवत अव्वलस्थान गाठले आहे. दिल्ली कॅपिटल्सने 11 पैकी 8 विजय आणि 3 पराभवासह 16 गुण प्राप्त करत प्ले ऑफचं तिकीट पक्के केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्या टप्प्यात दमदार कामगिरी करत प्ले ऑफची आस निर्माण केली. पण पंजाब विरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 12 सामन्यातील 5 विजय आणि 7 पराभवासह ते 10 गुण मिळवत चौथ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत पंजाब किंग्जने स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यात यश मिळवले. त्यांनी देखील 12 सामन्यातील 5 विजय आणि 7 पराभवासह 10 गुण मिळवले असून निगेटिव्ह रनरेटमुळे ते कोलकाताच्या एक पाउल मागे पडले आहेत.
मुंबई इंडियन्सने 11 सामन्यात 5 विजय नोंदवले असून 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या खात्यात सध्या 10 गुण जमा असून उर्वरित तिन्ही सामने जिंकून त्यांना थेट प्ले ऑफचं तिकीट मिळवण्याची नामी संधी आहे. राजस्थानचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. 11 पैकी 4 विजय आणि 7 पराभवामुळे त्यांच्या खात्यात केवळ 8 गुण जमा आहेत. जर त्यांनी उर्वरित सर्व सामने जिंकले तर जर-तरच्या समीकरणातून प्ले ऑफचा संघ ठरतील. सनरायझर्स हैदराबादने 11 सामन्यात केवळ 2 विजय नोंदवले आहेत. स्पर्धेतून बाद झालेला हा संघ उर्वरित तीन सामन्यातील विजयासह प्ले ऑफची गणिते बिघडवू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.