IPL 2021 Purple Cap च्या शर्यतीत आघाडीवर असलेले 5 गोलंदाज

जाणून घेऊयात पर्पल कॅपच्या शर्यतीतील पाच आघाडीचे गोलंदाज...
IPL 2021 Purple Cap
IPL 2021 Purple Cap
Updated on
Summary

जाणून घेऊयात पर्पल कॅपच्या शर्यतीतील पाच आघाडीचे गोलंदाज...

IPL 2021 Purple Cap: कोरोनामुळे ब्रेक लागलेल्या आयपीएलच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलचा विजेता हा युएईच्या मैदानात ठरणार आहे. आयपीएलच्या स्पर्धेत आपल्या गोलंदाजीची छाप सोडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या डोक्यावर पर्पल कॅप दिसते. सध्याच्या घडीला ही कॅप विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील युवा फिरकीपटूच्या डोक्यावर आहे. ती घालूनच तो मैदानात उतरेल. जाणून घेऊयात पर्पल कॅपच्या शर्यतीतील पाच आघाडीचे गोलंदाज....

१. हर्षल पटेल (Harshal Patel) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore )

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यात असलेल्या हर्षल पटेलने पहिल्या टप्प्यात झालेल्या सामन्यात सर्वाधिक विकेट मिळवल्या आहेत. भारतात झालेल्या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात RCB कडून प्रत्येक सामन्यात मैदानात उतरलेल्या हर्षल पटेलनं 7 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. 27 धावा खर्च करुन 5 विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. यंदाच्या हंगामातील सलामीच्या लढतीत हर्षल पटेलनं मुंबई इंडियन्सच्या अर्ध्या संघाला तंबूत धाडले होते. ईशान किशन, हार्दिक पांड्या, पोलार्ड, कृणाल पांड्या आणि मार्को जॅनसेन या पाच जणांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला होता.

२. आवेश खान (Avesh Khan) - दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals )

सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा युवा गोलंदाज आवेश खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. 8 डावात त्याने 14 विकेट घेतल्या आहेत. 7.70 च्या इकोनॉमीनं त्याने धावा खर्च केल्या असून दिल्ली कॅपिटल्सचा हा गोलंदाज हर्षल पटेलला कांटे की टक्कर देताना दिसला तर नवल वाटणार नाही. 32 धावा खर्च करुन घेतलेल्या 3 विकेट ही आवेश खानची सर्वोच्च कामगिरी आहे.

३. ख्रिस मॉरिस (Chris Morris ) - राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेला क्रिस मॉरिस पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. 7 कसोटी सामन्यात त्यानेही 14 विकेट मिळवल्या आहेत. त्याने 8.61 च्या इकोनॉमीनं धावा खर्च केल्या आहेत. 23 धावा खर्च करुन 4 विकेट ही क्रिस मॉरिसची सर्वोत्तम कामगिरी आहे.

४. राहुल चहर (Rahul Chahar) - मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चाहरनंही आपल्या फिरकीची जादू दाखवू दिली होती. राहुल चाहरनं 7 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने 27 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या होत्या. ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम वैयक्तीक कामगिरी आहे.

५. राशिद खान (Rashid Khan) - सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबादची आशेची किरण असणारा फिरकीपटू या यादीत पहिल्या पाचमध्ये आहे. राशीद खानने 7 सामन्यात 28 षटके फेकली. यात त्याने 10 विकेट घेतल्या असून 36 धावा खर्च करुन 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.