Mumbai Indians vs Delhi Capitals 46th Match : शारजहाच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सने दिलेल्या माफक धावा परतवून लावत स्पर्धेतील आणखी एका दिमाखदार विजयाची नोंद केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकात 8 बाद 129 धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर 130 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर श्रेयस अय्यरने मैदानात तग धरला. त्याला अश्विनने उत्तम साथ दिली. या दोघांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 4 गडी आणि 5 चेंडू राखत सामना खिशात घातला. अखेरच्या षटकात दिल्ली कॅपिटल्सला 4 धावांची आवश्यकता होती. रोहित शर्माने चेंडू क्रुणाल पांड्याकडे सोपवला. अश्विनने त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केला.
दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवामुळे स्पर्धेतील आपले आव्हान राखण्यासाठी मुंबई इंडियन्सला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. दिल्लीसह उर्वरित दोन सामने जिंकले असते तर मुंबईला थेट प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी होती. पण या पराभवामुळे त्यांची गणितं बिघडली आहेत. उर्वरित दोन सामने जिंकले तरी त्यांना आता केवळ 14 गुणांपर्यंत मजल मारता येईल. त्यामुळे रनरेट उत्तम ठेवून इतर निकालावर त्यांचे स्पर्धेतील भवितव्य अवलंबून असेल.
दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी त्याचा निर्णय सार्थ ठरवला. सुर्यकुमार यादवच्या 33 धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेल आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. अश्विन आणि नोर्तजेनं प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
93-6 : बुमराहनं रोहित करवी हेटमायरला केलं झेलबाद
77-5 : बोल्टनं अक्षर पटेलला पायचित करत धाडले माघारी
57-4 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतही अवघ्या 26 धावांची भर घालून माघारी, जयंत यादवने संघाला मिळवून दिलं महत्त्वपूर्ण यश
30-3 : स्मिथ अवघ्या 9 धावांची भर घालून परतला, कुल्टर नाइलनं मुंबईला मिळवून दिलं यश
15-2 : क्रुणाल पांड्यानं सलामीवीर पृथ्वीलाही धाडले माघारी, यशस्वी रिव्ह्यसह मुंबईला मोठ यश
14-1 : शिखर धवनच्या रुपात दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का, पोलार्डनं अप्रतिम क्षेत्ररक्षण करत त्याला धावबाद केलं
धवन-पृथ्वीनं केली दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला सुरुवात
122-8 : अखेरच्या षटकात मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात जयंत यादव झेलबाद
111-7 : आवेश खानने नॅथन कुल्टन नीललाही केलं बोल्ड
109-6 : आवेश खानच्या खतरनाक यॉर्करवर पांड्याच्या उडल्या दांड्या, त्याने 18 चेंडूत 17 धावांची खेळी केली
87-5 : नोर्तजेनं उडवल्या केरॉन पोलार्डच्या दांड्या, मुंबईचा अर्धा संघ तंबूत
80-4 : अक्षर पटेलनं सौरभ तिवाराचा खेळही केला खल्लास, त्याने 18 चेंडूत 15 धावांची खेळी केली
68-3 : सुर्यकुमार यादवच्या रुपात अक्षर पटेलनं मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का दिला, सूर्यानं 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या
37-2 : अक्षर पटेलनं मिळवलं मोठं यश; क्विंटन डिकॉक 18 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 19 धावा करुन झेलबाद
8-1 : हिटमॅन रोहित शर्मा स्वस्तात माघारी, 7 धावांवर आवेश खाननं धाडलं माघारी
असे आहेत दोन्ही संघ
Mumbai Indians (Playing XI): रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, नॅथन कुल्टर नील, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.
Delhi Capitals (Playing XI): पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार/ यष्टीरक्षक, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल. रविचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, नोर्तजे.
दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.