CSK vs RR, Dream11 Fantasy Tips : कटू सत्य; धोनीला घेऊन फायदा नाही!

यंदाच्या हंगामातील 47 व्या सामन्यात अव्वल कामगिरी करणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ स्पर्धेत संघर्ष करणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध भिडणार आहे.
CSK vs RR, Dream11 Fantasy Tips : कटू सत्य; धोनीला घेऊन फायदा नाही!
Updated on

आयपीएलच्या इतिहासात गतवर्षी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला (CSK) संघाला पहिल्यांदाच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली होती. यंदाच्या हंगामात मात्र धोनीच्या धुरंधरांनी धमाकेदार कमबॅक करत पहिल्यांदा प्ले ऑफ गाठणारा संघ होण्याचा मान मिळवला. यंदाच्या हंगामातील 47 व्या सामन्यात अव्वल कामगिरी करणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ स्पर्धेत संघर्ष करणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध भिडणार आहे.

जर चेन्नईने आपली बादशाहत कायम राखत राजस्थानला पराभूत केले तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. दुसरीकडे जर त्यांनी यश मिळवले तर स्पर्धेतील आशा काही वेळासाठी का होईना पण पल्लवित होती. एका बाजूला चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या स्थानावर असून राजस्थान रॉयल्स सातव्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील. याशिवाय अन्य संघाच्या निकालावरही अवलंबून रहावे लागेल.

CSK vs RR, Dream11 Fantasy Tips : कटू सत्य; धोनीला घेऊन फायदा नाही!
KKR vs PBKS: शाहरुखच्या षटकारानं पंजाबचा भागंडा!

RR vs CSK, My Dream11 Team Prediction:

यष्टीरक्षक: संजू सॅमसन

फलंदाज: ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, यशस्वी जयस्वाल, इविन लुईस

गोलंदाज: कार्तिक त्यागी, चेतन सकारिया, जोश हेजलवुड.

अष्टपैलू: ड्वेन ब्रावो, रविंद्र जाडेजा

CSK vs RR, Dream11 Fantasy Tips : कटू सत्य; धोनीला घेऊन फायदा नाही!
IPL 2021 : मै हूं ना...शाहरुखच्या संघाला मिळाला नवा हिरो!

राजस्थान विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने रेकॉर्ड

चेन्नई आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत एकूण 24 सामने झाले आहेत. यातील 15 सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली आहे. तर केवळ 9 सामने राजस्थानने जिंकले आहेत.

राजस्थानचा संभाव्य संघ :

राजस्थान रॉयल्स: एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक, लियाम लिविंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया, मुस्तफिजुर रहमान.

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोइन अली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, जोश हेजलवुड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()