IPL 2021: सनरायजर्स हैदराबादच्या नटराजनला कोरोनाची लागण

नटराजनचा आरटी-पीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
टी. नटराजन
टी. नटराजन
Updated on

यूएई: दुबईमध्ये (Dubai) सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाने प्रवेश केला आहे. सनरायजर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज टी. नटराजनला कोरोनाची लागण झाली आहे. नटराजनचा (Natrajan) आरटी-पीसीआर रिपोर्ट (Rtpcr test) पॉझिटिव्ह आला आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली आहे. कोविड पॉझिटिव्ह असला, तरी सध्या नटराजनमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्याने स्वत:ला आयसोलेट केले आहे. एप्रिल-मे महिन्यात भारतात आयपीएलचा मोसम सुरु असताना काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याने सामने स्थगित करण्यात आले होते. आता हे सर्व सामने दुबईमध्ये होत आहेत. पण तिथेही कोरोनाने प्रवेश केला आहे.

सनरायजर्स हैदराबाद संघासाठी हा एक धक्का आहे. आजपासून दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध मोहिम सुरु करण्याच्या काहीतास आधी नटराजनचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ठरल्याप्रमाणे सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाईल असे बीसीसीआयने म्हटले आहे. अन्य खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

टी. नटराजन
हेअर ट्रान्सप्लांट नंतर तीन दिवसांनी ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

"नटरानच्या संपर्कात असलेल्यांची स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे" अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. सहाजण सतत नटराजनच्या संपर्कात होते. अष्टपैलू विजय शंकरला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. संघ व्यवस्थापक विजय कुमार, श्याम सुंदर, अंजना वन्नन, तृषार खेडकर आणि गोलंदाज पेरीयासामी गणेशन नटराजनच्या सतत संपर्कात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.