विराट कोहलीने Virat Kohli) भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. गुरुवारी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक निवेदन शेअर करुन टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले. टी-20 संघाचा कर्णधार म्हणून वर्ल्ड कप स्पर्धा त्याच्यासाठी अखेरची असेल. विराट कोहलीने घेतलेल्या या निर्णयानंतर आयपीएल टी-20 स्पर्धेत तो RCB चं नेतृत्व करणार की असाच काहीसा निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कर्णधार बदलणार का? विराट कोहली स्वत: यासंदर्भातही निर्णय घेईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. पण आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाची झलक दिसलेली नाही. रॉयल चॅलेंजर्सचे नेतृत्व करताना त्याने आपल्या संघाला एकही ट्रॉफी जिंकून दिलेली नाही.
2013 मध्ये विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB ने केवळ 60 सामने जिंकले आहेत. 65 सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विजयाची टक्केवारी ही 48.04 टक्के इतकी आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक 60.16 टक्के पर्सेंटेजसह अव्वल राहिला आहे. रोहितनं मुंबई इंडियन्सला विक्रमी 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवून दाखवलं आहे.
कोहली बंगळुरुच्या कर्णधार पदाचाही राजीनामा देणार?
संघाला जेतेपद मिळवून देण्यात विराट कोहली अपयशी ठरला असला तरी फ्रेंचायझींनी मागील 8 वर्षांपासून विराट कोहलीवर भरवसा दाखवला आहे. जर 2021 मध्ये विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला तर यासंदर्भातील मोठा निर्णय पाहायला मिळू शकतो. आयपीएलच्या आगामी हंगामात 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे मेगा लिलावात मोठे फरबदल दिसतील, असे बोलले जात आहे. जर बंगळुरुला जेतेपद मिळवून देण्यात विराट यंदा अपयशी ठरला तर त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधारपदही गमवावे लागू शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.