नवी दिल्ली: आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) येत्या 26 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना मुंबईमध्ये रंगणार असून हा सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. विशेष म्हणजे दीर्घ काळानंतर आयपीएलमध्ये प्रेक्षकांना (Crowd) प्रवेश मिळणार आहे. या संदर्भात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने एक वक्तव्य प्रसिद्ध केले.
आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, 'आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा पहिला सामना स्मरणीय ठरणार आहे. कारण मैदानात पुन्हा एकदा प्रेक्षकांची एन्ट्री होणार आहे. आयपीएलची साखळी फेरी मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात होणार आहे. यावेळी कोरोनाच्या नियमांनुसार मैदानातील आसन क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.'
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट या दोन नव्या संघाचा समावेश होत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात 74 सामने होतील. यातील 70 सामने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन, डी वाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील एमसीए मैदानावर होणार आहेत. यातील प्रत्येकी 20 सामने हे वानखेडे आणि डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत. तर ब्रेबॉन आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमवर प्रत्येकी 15 सामने होणार आहेत.
बीसीसीआयने आयपीएलच्या सामन्याच्या तिकिट खरेदीसाठी ऑनलाईन सुविधा पुरवली आहे. तुम्ही www.iplt20.com आणि www.BookMyShow.com या दोन वेबसाईटवरून तिकिट बुक करू शकता. बुधवारपासून आयपीएलच्या तिकिट विक्रीला सुरुवात होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.