IPL 2022: दिल्लीला कंजूसपणा भोवणार? चोप्राची 'आकाश'वाणी

Akash Chopra criticize Delhi Capitals Overseas players strategy
Akash Chopra criticize Delhi Capitals Overseas players strategy esakal
Updated on

नवी दिल्ली: दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) सुरूवातीचे काही सामने जड जाण्याची शक्यता आहे. दिल्लीला त्यांच्या विदेशी खेळाडूंची (Overseas players of Delhi Capitals) उणीव भासू शकते. दिल्ली कॅपिटल्सकडे सध्या साथ विदेशी खेळाडू आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ 24 सदस्यांचा आहे. मात्र एनरिच नॉर्त्जे (Anrich Nortje), डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मिशेल मार्श (Mitchell Marsh) यासारखे दमदार खेळाडू सुरूवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने आपली प्रतिक्रिया दिली.

Akash Chopra criticize Delhi Capitals Overseas players strategy
श्रेयसची चॉईसच निराळी; विराट-रोहित नाही तर 'हा' अपयशी कर्णधार आवडीचा

आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'आश्चर्य तुमच्याकडे फक्त 7 विदेशी खेळाडू आहेत. तुम्ही आठ विदेशी खेळाडू ठेऊ शकला असता. तुम्ही आठवा विदेशी खेळाडू का घेतला नाही. ही कंजूसी मला समजली नाही. आधीच सात विदेशी खेळाडू आहेत जर नॉर्त्जे आला नाही तर सहा होतील. सहा मधील दोन ते तीन खेळाडू उपलब्ध नाहीत. मग पहिल्या सामन्यात तुम्ही काय करणार? तुमच्याकडे खेळाडूच नाहीत. तुमच्याकडे काहीच शिल्लक नाही.'

आकाश चोप्राने दिल्ली कॅपिटल्सने नॉर्त्जेला रिटेन करून मोठी चूक तर केली नाही ना असे वक्तव्य केले. नॉर्त्जेला रिटेन करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे सांगितले. तो म्हणाला, 'तुम्ही तुमचे चार खेळाडू रिटेन केले. यात नॉर्त्जेचा देखील समावेश होता. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया होणार याची चर्चा आधीपासूनच होती. शस्त्रक्रियेनंतर त्याने क्रिकेट खेळलेले नाही. तुम्ही त्याच्यावर जुगार खेळला. दिल्ली कॅपिटल्सने कगिसो रबाडापेक्षा नॉर्त्जेला जास्त महत्व दिले.'

Akash Chopra criticize Delhi Capitals Overseas players strategy
IPL 2022 मध्ये आता विदर्भाची 'पंच'गिरी

चोप्रा पुढे म्हणाला की, 'तुम्ही रबाडाला जाऊ दिले. तुम्ही विचार केला की तुम्ही कोणा दुसऱ्याला खरेदी करू शकाल आणि नॉर्त्जे संघात येईल. नॉर्त्जेच्या बाबतीत वाटत आहे की तो आयपीएल खेळू शकणार नाही. सध्या तरी अशीच बातमी आहे. आता नॉर्त्जेचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.