लखनौ सुपर जाएंट्सने (Lucknow Super Giants) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) ठेवलेले 200 पारचं लक्ष्य पार करुन यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. या सामन्यात युवा आयुष बडोनी (Ayush Badoni) याने पुन्हा एकदा आपल्यातील क्षमता दाखवून दिली. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या आयुषनं या सामन्यात मॅच विनिंग खेळी केली. लखनौच्या पहिल्या विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला.
चेन्नई विरुद्धच्या लढतीत त्याची छोटीखानी खेळी मॅचला कलाटणी देणारी ठरली. त्याने या सामन्यात 9 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्याने दोन खणखणीत षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. यातील एका षटकाराची सध्या जोरदार चर्चा सुरुये. आयुष बडोनी याने मारलेला षटकाराने स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी आलेल्या महिला प्रेक्षकाला जाऊन लागला.
मुंबईतील ब्रेब्रोनच्या मैदानात रंगलेल्या चेन्नई आणि लखनौ यांच्यातील सामन्यात धावांची अक्षरश: बरसात झाली. आधी रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील संघाने धुंवाधार बॅटिग केली. चेन्नईकडून उथप्पाने अर्धशतक ठोकले. तर शिवम दुबेनं 49 धावांच स्फोटक खेळी केली. चेन्नईने निर्धारित 20 षटकात 7 बाद 210 धावा केल्या होत्या. राहुल आणि डिकॉकने धमाकेदार सलामी देत आव्हान सोपे केले. त्यानंतर लुईस आणि आयुष बडोनीच्या दमदार खेळीच्या जोरावर लखनौनं 6 विकेट्सनी विजय नोंदवला.
अखेरच्या 12 चेंडूत लखनौला 34 धावांची आवश्यकता असताना जडेजाने चेंडू शिवम दुबेच्या हाती सोपवला. ही ओव्हर दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण होती. आयुष बडोनीनं पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार मारला. त्याने मारलेला चेंडू प्रेक्षक स्टँडमध्ये जाऊन पडला. तो थेड एका महिलेच्या डोक्यावर पडल्याचे दिसले. तिला किरकोळ दुखापतही झाल्याचे समजते. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.