IPL संकटात; DC खेळाडूंचा RT-PCR रिपोर्टवर स्पर्धेच भवितव्य?

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील 30 व्या सामन्यापूर्वी एक चिंताजनक बातमी
Delhi Capitals Player Tested Covid Positive | IPL Covid Updates
Delhi Capitals Player Tested Covid Positive | IPL Covid Updatessakal
Updated on

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील 30 व्या सामन्यापूर्वी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिजिओ पॅट्रिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता संघात आणखी प्रकरणे समोर आली आहेत. दिल्ली कॅम्पमध्ये परदेशी खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सुत्राच्या माहिती नुसार समोर आले. 20 एप्रिलला संघाला पंजाबशी पुढचा सामना खेळायचा जाणारा आहे.(IPL Delhi Capitals Player Tested Covid Positive)

आयपीएलमध्ये कोरोनाची प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र चिंता वाढली आहे. दिल्ली संघातील आणखी दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. सुत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार त्यात एक विदेशी खेळाडूही असू शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या शुक्रवारी टीमचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले होते.

बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिल्ली कॅपिटल्स आज पुण्याला रवाना होणार होता. परंतु संघातील सर्व खेळाडूंना त्यांच्या हॉटेलच्या खोलीत विश्रांती घेण्यास सांगितले आहे. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत आहे. सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. जेणेकरून फिजिओ पॅट्रिकची कोरोनाची केस एकटी होती की टीमच्या कॅम्पमध्ये इतर प्रकरणे आहेत हे कळू शकेल.

सुत्राच्या माहितीनुसार दिल्लीला पुढील सामन्यासाठी पुण्याला जाण्याचा प्लॅन बदलायाला सांगण्यात आले. आज सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी झाल्यानंतरच संघ आता पुढील सामन्यासाठी रवाना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिल्ली संघाने आपला शेवटचा सामना बेंगळुरूविरुद्ध खेळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.